एक्स्प्लोर
भाजप ही राष्ट्रवादी काँग्रेसची ‘बी टीम’: उद्धव ठाकरे
पिंपरी: ‘भाजपच्या सत्तेचा हत्ती उसळत असेल तर त्याच्या डोक्यात मी अंकुश हाणणार.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. तसेच भाजप ही राष्ट्रवादीची बी टीम असल्याचा आरोपही यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.
‘काही जण मला विचारतात तुम्ही सत्तेत पण आहात आणि विरोधही करता. मी त्यांना उदाहरण दिलं की, मी हत्तीवर अंबारीत बसलो आणि जर हत्ती उधळला तर मी अंकुश मारु की नको? त्यामुळे जेव्हा जेव्हा हा हत्ती उसळेल तेव्हा मी त्याच्या डोक्यात अंकुश मारणारच.’ असं म्हणत उद्धव ठाकरेनी भाजपवर जोरदार टीका केली.
भाजपसोबतच काँग्रेस असो की राष्ट्रवादीवरही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधीलच अर्धी माणसं गेली आहेत. ज्यांच्या विरुद्ध लढलो तिच माणसं तुम्ही पक्षात घेतली. मग भाजपला का विरोध करायचा नाही? असा सवालही त्यांनी विचारला.
दुसरीकडे, पुण्यातील सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादी ही कनफ्युज पार्टी आहे. येत्या काळात त्यांच्याकडे पुण्यासह पिंपरी चिंचवडही राहणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
आपण सर्वांनी राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार पाहिलेला आहे. काँग्रेसचं तर अस्तित्वच दिसत नाही. आणि आमचा मित्रपक्ष (शिवसेना) तर पुण्यात शोधूनही सापडत नाही. मित्रपक्ष सत्तेसाठी कुठे काँग्रेससोबत तर कुठे राष्ट्रवादीसोबत सेटिंग करतो. अशी टीका मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर केली.
संबंधित बातम्या:
एनसीपी म्हणजे ‘नॅशनलिस्ट कनफ्युज पार्टी’, मुख्यमंत्र्यांची टीका
पुणे विमानतळावर उद्धव ठाकरे- मुख्यमंत्री समोरासमोर, आणि...
सत्ता स्थापण्यासाठी पुन्हा भाजपसोबत कदापि जाणार नाही : उद्धव ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement