एक्स्प्लोर

Trupti Desai : राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात?; सर्वपक्षीयांच्या वाडेश्वर कट्ट्यावरुन तृप्ती देसाई कडाडल्या

पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसाठी  फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी संताप व्यक्त केला आहे. राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात?, अशी सडकून टीका त्यांनी केली आहे.

Trupti Desai :  पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसाठी  फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी संताप व्यक्त केला आहे. राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात?, अशी सडकून टीका त्यांनी केली आहे. कालच  पुण्यात पंधरा वर्षे आमदार असलेले विनायक आबा निम्हण यांचे अचानक निधन झाले त्यांना जाऊन 24 तास पण झालेले नाहीत तरीही या सर्वपक्षीय नेत्यांनी दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला. त्यावरुन त्यांनी टीका केली आहे. फेसबुकवर पोस्टवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरवर्षी पुण्यातील सर्वपक्षीय नेते दिवाळी निमित्त वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र येतात. वर्षभर सगळे नेते, आमदार एकमेकांवर टीका आणि राजकीय फटकेबाजी करत असतात, आरोप करत असतात. या सगळ्या मनभेद आणि मतभेदांना दूर ठेवून दिवाळीच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात. गप्पा करतात एकमेकांना फराळ भरवतात. 

यंदा दोन वर्षांनी दिवाळी निर्बंधमुक्त साजरी झाली. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. राजकीय नेत्यांच्या घरात देखील उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. शहराच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी एकमेकांवर फटकेबाजी करणाऱ्या पुण्यातील नेते आणि आमदारांनी वाडेश्वर कट्ट्यावर फराळाचा आस्वाद घेतला. आवडीच्या विषयांवर गप्पा देखील मारल्या. मात्र या सगळ्याचा तृप्ती देसाईंनी निषेध केला आहे. दरवर्षीच हा कट्टा घेण्यात येतो. मात्र माजी आमदारांना जाऊन 24 तास व्हायच्या आधीच तुम्ही एकत्र फराळासाठी भेटता. आमदार निम्हणांवर आलेली वेळ सगळ्यांवरच येणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे. 

फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलंय?
'आज वाडेश्वर कट्ट्यावर  सर्वपक्षीय राजकीय लोकप्रतिनिधींसाठी सकाळी फराळ आयोजित करण्यात आला होता, खरंतर हा कार्यक्रम पुढे ढकलता आला असता. कालच पुण्यात पंधरा वर्षे आमदार असलेले विनायक आबा निम्हण यांचे अचानक निधन झाले, त्यांना जाऊन 24 तास पण झालेले नाहीत. आज फराळ करताना, पदार्थांवर ताव मारताना वाडेश्वर कट्ट्यावर दिसलेले आबांचे हे सर्वच सहकारी आणि जवळचे मित्र परंतु एन्जॉय करताना दिसले. कदाचित कट्ट्यावर श्रद्धांजली ही यांनी वाहिली असेल परंतु त्यांना दिलेला अग्नी अजूनही शांत झालेला नसताना हे जे सर्व झाले त्याचा निषेधच आहे. आबांवर जी वेळ आली ती सर्वांवरच एक दिवस येणार आहे परंतु राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात हाच मोठा प्रश्न माझ्यासारख्या  कार्यकर्तीला पडलेला आहे', असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Vivekanand Patil On Raj Thackeray: पुण्यातील MPSC चं आंदोलन स्थगित, राज ठाकरेंनी केला विवेकानंद पाटीलला फोन, म्हणाले...
पुण्यातील MPSC चं आंदोलन स्थगित, राज ठाकरेंनी केला विवेकानंद पाटीलला फोन, म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले

Embed widget