एक्स्प्लोर
पुण्यात नो पार्किंगमधील गाडी चालकासह उचलली
नो पार्किंगमध्ये लावलेली गाडी उचलताना टोईंग कर्मचाऱ्यांना अडवणाऱ्या चालकालाही दुचाकीसह उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील विमाननगरमध्ये बुधवारी 30 मे रोजी हा प्रकार घडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वाहतूर पोलिसांच्या समक्ष दुचाकीस्वाराला उचलण्यात आलं.
पुणे : नो पार्किंगमध्ये लावलेली गाडी उचलताना टोईंग कर्मचाऱ्यांना अडवणाऱ्या चालकालाही दुचाकीसह उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील विमाननगरमध्ये बुधवारी 30 मे रोजी हा प्रकार घडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वाहतूर पोलिसांच्या समक्ष दुचाकीस्वाराला उचलण्यात आलं.
विमाननगरमधील लुंकड प्लाझासमोर दुचाकीस्वाराने आपली गाडी पार्क केली होती. गाडी नो पार्किंगमध्ये असल्यामुळे टोईंग व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी गाडी टो करण्यास सुरुवात केली. गाडीवर दुचाकीस्वार बसलेला पाहून कर्मचाऱ्यांनी त्याच्यासह दुचाकी उचलून टेम्पोत टाकली.
याचा व्हिडीओ एका पादचाऱ्याने बनवला आणि सोशल मीडियावर टाकला. दरम्यान याविषयी येरवडा वाहतूक पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित वाहतूक पोलीस रजेवर असून तो रुजू झाल्यावर चौकशी करु असं उत्तर देण्यात आलं.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement