एक्स्प्लोर

पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीचे 2018 पासूनचे तीन माजी अध्यक्ष एसीबीच्या रडारवर

पिंपरी चिंचवड महापालिकेतील 2018 ते 2020 या दरम्यानच्या तिन्ही माजी स्थायी समिती अध्यक्षांची कधीही चौकशी होऊ शकते. तशी माहिती एसीबीकडून प्राप्त झाली आहे.

पिंपरी चिंचवड : आता पिंपरी चिंचवड महापालिकेतील 2018 पासूनचे स्थायी समिती माजी अध्यक्ष एसीबीच्या रडारवर आलेत. विद्यमान अध्यक्ष नितीन लांडगेसह पाच जणांना एसीबीने 18 ऑगस्टला रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी ज्या जाहिरातदार व्यावसायिकाने एसीबीकडे तक्रार केली, ते प्रकरण 2018 पासून निर्णयाविना प्रलंबित होतं. म्हणूनच एसीबीने तक्रारदाराशी संबंधित 2018पासूनची सर्व कागदपत्रे हाती घेतली आहेत. त्याअनुषंगाने 2018 ते 2020 या दरम्यानच्या तिन्ही माजी अध्यक्षांची कधीही चौकशी होऊ शकते. तशी माहिती एसीबीकडून प्राप्त झाली आहे. सध्या स्थायी समितीच्या उर्वरित पंधरा सदस्यांची चौकशी सुरू आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेत 18 ऑगस्टला एसीबीने सापळा रचला. हा सापळा स्थायी समितीच्या कार्यालयाभोवती होता. पाच तास दबा धरून बसलेल्या या पथकाच्या जाळ्यात मोठा मासा अडकला. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे आणि चार कर्मचाऱ्यांना एसीबीने रंगेहाथ अटक झाली. न्यायालयाने या पाच ही जणांची रवानगी पोलीस कोठडीत केली. चौकशीत एसीबीच्या हाती एक ऑडिओ क्लिप लागली. तक्रारदार जाहिरात व्यावसायिक आणि मुख्य लिपिक तथा स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळेचा यात संवाद होता. संवादात ठरलेली लाच ही सोळा व्यक्तींना द्यावी लागते, असा उल्लेख होता. या सोळा व्यक्ती म्हणजे स्थायी समितीचे सोळा सदस्य असल्याचा दावा एसीबीने न्यायालयात केला. अध्यक्ष नितीन लांडगे यांची चौकशी आधीपासून सुरूच होती. त्यामुळे उर्वरित पंधरा सदस्य एसीबीच्या रडारवर आले. यात भाजपचे नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेना एक आणि भाजप संलग्न एक अशा पंधरा सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांना 22 सप्टेंबरला एसीबीने नोटिसा धाडल्या. 29 सप्टेंबर पर्यंत त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश आहेत.

तक्रारदार जाहिरातदार व्यावसायिकाचे हे प्रकरण 2018 पासून निर्णयाविना प्रलंबित होते. त्यामुळेच एसीबीने 2018 पासूनचा तपास करायला सुरुवात केलीये. यासाठी एसीबीने तक्रारदाराशी संबंधित 2018 ते 2021 या काळातील सर्व कागदपत्रे हाती घेतली आहेत. त्याअनुषंगाने 'ते' तीन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आता एसीबीच्या रडारवर आले आहेत. त्यांना कधी ही चौकशीला बोलावलं जाऊ शकतं. सध्या स्थायी समितीच्या 'त्या' पंधरा सदस्यांची चौकशी सुरू आहे, त्यापैकी बारा सदस्यांनी एसीबी कार्यालयात जाऊन जवाब दिला आहे. उर्वरित तिघांपैकी भाजपचे रवी लांडगे यांनी निवडीनंतर पहिल्याच दिवशी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची चौकशी होणार नसल्याचं एसीबीकडून सांगण्यात येतंय.

पिंपरी चिंचवड महापालिकेत 2017 साली इतिहास घडला. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात इतिहासात पहिल्यांदाच एकहाती सत्ता काबीज केली. पण त्यांच्याच सत्तेत पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच मोठी कारवाई पार पडली आहे. ज्याचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उमटणार हे नक्की.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : नव्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
व्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shakitpith Kolhapur Mahamarg : कसा असणार शक्तिपीठ महामार्ग? 'माझा'चा स्पेशल रिपोर्टSpecial Report Currency Found: राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटाZero Hour Mahayuti Fight : पालकमंत्रीपदावरुन महायुतीत चढाओढ? कुणाची वर्णी लागणार?Zero Hour Devendra Fadnavis Exclusive :देवेंद्र फडणीस मित्र पक्षांच्या महत्वकांक्षा कश्या संभाळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : नव्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
व्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
Pravin Darekar: राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर... प्रविण दरेकर म्हणाले...
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर...
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
Embed widget