एक्स्प्लोर

पुण्यातील सावकाराच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

पुण्यात काही दिवसांपूर्वी पप्पू पडवळ नावाच्या सावकाराची कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे पप्पू पडवळ हा सुद्धा सराईत गुन्हेगार होता.

पुणे : पुण्यात 9 जुलै रोजी झालेल्या सावकाराच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. घनश्याम उर्फ पप्पू पडवळ असे खून झालेल्या नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी लतिफ बाबू शेख, शुभम प्रमोद कासवेकर आणि शुभम संतोष उबाळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणातील मृत व्यक्ती देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 12 गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

50 लाखाच्या मोबदल्यात दोन कोटी देऊनही आणखी 80 लाख रुपयांची मागणी केल्याने सावकाराची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पुण्यातील कोंढवा परिसरात 11 जुलै रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. मुख्य आरोपी लतीफ शेख याने पप्पू पडवळ याच्याकडून चार वर्षापूर्वी व्याजाने 50 लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात त्याला आतापर्यंत दोन कोटी रुपये दिले होते. परंतु पप्पू पडवळ त्याच्याकडे आणखी 80 लाख रुपये मागत होता आणि पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे लतीफने पप्पू पडवळची हत्या करण्याचा कट रचला.

लतीफ शेख याची आई आजारी असताना एका मौलवीने दिलेल्या औषधामुळे ती बरी झाली होती. ही माहिती त्याने पप्पू पडवळ त्याला दिली होती. पडवळ सुद्धा आजारी पडत असल्यामुळे त्याने मौलवीला घेऊन लतीफला घरी बोलवले होते. हीच संधी साधून लतीफने पप्पू पडवळला मारण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने इतर दोन आरोपींना दहा लाख रुपयांचं आमिष दाखवून आपल्या सोबत घेतलं. नऊ जुलैच्या रात्री लतीफ शेखने इतर दोघांना मौलवी असल्याचं भासवून पडवळच्या फ्लॅटमध्ये नेलं. त्यानंतर तिघांनी मिळून पडवळवर कोयत्याने 50 ते 55 कोयत्याने वार करत त्याची निर्घृण हत्या केली होती. आरोपींनी कुठलाही पुरावा मागे ठेवला नव्हता. पडवळाच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही ते घेऊन गेले होते.

दोन दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना लतीफने पप्पू पडवळकडून पन्नास लाख रुपयाचं कर्ज घेतल्याचं समजलं. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता त्याच्या माहितीत विसंगती आढळली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने खून केल्याची कबुली दिली. लतीफने पडवळला पन्नास लाखाच्या बदल्यात दोन कोटी देऊनही तो आणखी 80 लाख मागत होता. तसंच लतीफ राहत असलेला फ्लॅट स्वतःच्या नावावर करुन घेण्यासाठी दबाव टाकत होता. लतीफ शेख यांच्या घरातील महिलांविषयी वाईट बोलत होता. त्यामुळे हा खून केल्याचं त्याने सांगितलं. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी अतिशय शिताफीने गुन्ह्याचा तपास करत आरोपींना अटक केली.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Climate Week India 2026: हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन
हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
Siya Goyal Pune Crime: सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
Ketan Agrawal Case : साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

Embed widget