एक्स्प्लोर

Diksha Dinde success story: व्हीलचेअर गर्लचा जज्बा! मोटीवेशनल स्पीकर ते ब्रिटिश सरकारची स्कॉलरशिप, पुण्याच्या दीक्षा दिंडेच्या जिद्दीची कहाणी

Diksha Dinde : वस्तीतील मुलाचं शिक्षण, अपंग मुलांच्या मासिक पाळी या विषयांवर काम करणाऱ्या संस्थेत दीक्षाने काम करायला सुरुवात केली. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाची 'ग्लोबल युथ अँबेसिटर' म्हणून तिची निवड झाली.

Diksha Dinde Pune:  "हौसले बुलंद हो, तो मंजिले दूर नही होती"  हे वाक्य जगणारी आणि जगवणारी पुण्याची दीक्षा दिंडे. जन्मापासून तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले आहे. 84 टक्के अपंग आहे. मात्र तरीदेखील तिने हार न मानता स्वत:चा प्रवास सुरु ठेवला. ती जगभरात ‘मोटीवेशनल स्पीकर’  म्हणून प्रसिद्ध आहे.  'व्हीलचेअर गर्ल' म्हणून देखील ती प्रसिद्ध आहे. आता दीक्षानं अजून एक मोठं यश मिळवलं आहे. ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित स्कॉलरशिपची मानकरी ठरली आहे. चेवनिंगची मानाची स्कॉलरशीप तिला मिळाली आहे.  स्वत:च्या पायावर उभी न राहू शकणाऱ्या दीक्षाने स्वप्नपुर्तीच्या दिशेने उंच झेप घेतली आहे. दीक्षा उच्च शिक्षित आहे. पुण्यात ती स्पर्धा परिक्षेची तयारी करते. प्रशासनात काम करण्याचं तिचं स्वप्न आहे.

कात्रजच्या सोनवणे चाळीत दहा बाय बाराच्या घरात राहणारी मुलगी

दीक्षानं फेसबुक पोस्ट करत आपला आनंद साजरा केला आहे. तिनं म्हटलंय, कात्रजच्या सोनवणे चाळीत दहा बाय बाराच्या घरात राहणारी कोण कुठली ही दीक्षा.आज ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित स्कॉलरशिपची मानकरी ठरली आहे. आता बरोबर 24 तास होतील रिझल्ट हातात येऊन. परंतु अजूनही ही बातमी पचवायला जड जातेय. चेवनिंगच्या interview दरम्यान एक प्रश्न विचारला गेला. तुझ्या व्यक्तिमत्त्वावर ज्या व्यक्तींचा प्रभाव आहे अशा 'लीडर्स' बद्दल बोल.  उत्तर देताना तोंडातून फक्त दोन व्यक्तींची नावे पडली. एक सावित्रीमाय, जिच्यामुळे आज आम्ही शिक्षण घेऊ शकतोय आणि दुसरी म्हणजे आई. जिने कधीच हार मानून माझी साथ सोडली नाही.  हे उत्तर कोणाला convince करण्यासाठी नव्हतंच मुळी. काल रिझल्ट लागल्यावर आईकडे बघून जे समाधान मिळालय अथवा तिने काय कष्ट घेतलेत, ते मी कोणत्याच शब्दात सांगू शकत नाही. 'पुणे महानगरपालिका कात्रज 94 जी' इथून तिच्या कडेवर बसून सुरू झालेल्या या प्रवासाने मला खूप उंच उडण्याची दिशा दाखवली, असं दीक्षा म्हणते.

विविध समस्यांवर दीक्षाचं मोठं काम

पुण्यातील वस्तीतील मुलाचं शिक्षण, अपंग मुलांच्या समस्या आणि मासिक पाळी या सगळ्या विषयांवर काम करणाऱ्या संस्थेत दीक्षाने काम करायला सुरुवात केली. त्यानंतर 2016 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची 'ग्लोबल युथ अँबेसिटर' म्हणून तिची निवड झाली. तिने आणि काही सहकाऱ्यांनी मिळून पुण्याच्या झेड ब्रिजच्या खाली शाळा सुरु केली. सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या मुलांच्या प्रश्नांवर त्यांच्या समस्यांवर काम करण्याचा निर्धार केला. स्वत: व्हीलचेअरवर असताना सगळ्या मुलांना यशाच्या मार्गाने चालण्याचे धडे देत होती. 

अपंगत्वामुळे तिला अनेक समस्यांचा सामना

अपंगत्वामुळे तिला अनेक ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. अनेकांचे बोलणे ऐकावे लागले मात्र ती थांबली नाही. कॉलेजच्या सहलीत अपंगत्वामुळे तिला डावलण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर तिने जगभर फिरण्याचा निर्णय घेतला. ती स्वत:ला 'गर्ल ऑन व्हील्स' नाही तर 'गर्ल ऑन विग्ज' म्हणते. तिच्या या प्रवासाची आजपर्यंत अनेकांनी दखल घेतली आहे. 

तुमचे विचारच तुमच्या आयुष्याची वाट ठरवतात. जी मुलगी आईच्या मदतीशिवाय घराच्या बाहेरसुद्धा निघू शकत नाही तिच मुलगी आज अनेक देशांमध्ये ‘मोटीवेशनल स्पीकर’ म्हणून जाते यावर माझा देखील विश्वास बसत नाही. माझ्या आईवडिलांना माझ्यासारखं अपंग मुल जन्माला आल्याने त्यांनादेखील अनेकांनी त्रास दिला मात्र त्यांच्याच सहकार्यामुळे आज मी पाय नसताना देखील स्वप्नांच्या दिशेने उडू शकते. माणसाने जगत आणि जगवत रहावं. ध्येयाकडे वाटचाल करताना अनेकांना सोबत नेता येईल का? याचा विचार करावा, असं ती अभिमानाने सांगते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget