एक्स्प्लोर

Pune Porsche Car Accident : पुण्यातील अनधिकृत पब बारवरील कारवाईचा 'हातोडा' अचानक 'थंडावला'! कारवाईची संख्या 40 वरून फक्त 2 वर आली

पोर्शे कार (Pune Porsche Car Accident) अपघात प्रकरणाचा देशव्यापी संतापाने कारवाईने वेग घेतला. यानंतर सर्वप्रथम कारवाई पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बार, पब आणि रुफटाॅप हाॅटेलवर कारवाई झाली.

Pune Porsche Car Accident : पुण्यातील धनाढ्य बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराने दारुच्या नशेत भरधाव पोर्शे कार चालवत कल्याणी नगरमध्ये दोघांना चिडून मारल्यानंतर पुण्यातील प्रशासकीय यंत्रणा किती पोखरली गेली आहे याचाच पुरावा दररोज समोर येत आहे. अग्रवालच्या पोराने केलेल्या पराक्रमानंतर पुण्यातील पोलीस, ससून रुग्णालय, एक्साईज खाते, आरटीओ, महापालिका, मध्यरात्रीच पोहोचलेले आमदार सुनील टिंगरे, त्याचबरोबर अतिशय हास्यास्पद आणि कायद्याची लाज निघेल असा जामीन देणारे बाल हक्क मंडळ या सर्वच यंत्रणा किती खोलवर पोखरली गेली याचाही पुरावा समोर आला होता. 

दरम्यान पोर्शे कार (Pune Porsche Car Accident) अपघात प्रकरणाचा देशव्यापी संताप पसरल्यानंतर कारवाईने वेग घेतला. यानंतर सर्वप्रथम कारवाई पुणे आणि पिंपरी चिंचवडमधीलअनधिकृत बार, पब आणि रुफटाॅप हाॅटेलवर धडक कारवाई करत बुलडोझर फिरवण्यात आला. विशाल अग्रवालच्या पोराला ज्या पबमध्ये दारू देण्यात आली त्याठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात आली. मालक आणि व्यवस्थापक सुद्धा अटकेत आहे. 

पुण्यात पब बारवर कारवाईचा वेग मंदावला

मात्र, अपघात झाल्यानंतर ज्या वेगाने कारवाई करण्यास सुरू करण्यात आली होती तो कारवाईचा वेग मात्र गेल्या दोन दिवसांपासून कमालीचा थंडावला आहे. अपघात घडल्यानंतर 22 मे रोजी पुण्यात तब्बल 40 ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. मात्र आता तोच आकडा 29 मेपर्यंत फक्त दोनपर्यंत येऊन पोहोचला आहे. कारवाई सुरू केल्यापासून 22 मे ते 29 मे या कालावधीमध्ये 77 प्रकरणांमध्ये कारवाई झाली. मात्र, हा कारवाईचा धडाका पहिल्या दिवसाच्या तुलनेत सातव्या दिवसांपर्यंत पूर्णतः खाली आला. त्यामुळे यांना कोणाचा वरदहस्त आहे आणि कारवाई अचानक का थंडावली अशी चर्चा पुणेकर नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. 

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभाग विभागाने गेल्या सहा दिवसांमध्ये 77 अनधिकृत पब बारवर कारवाई करून एक लाख 7 हजार 299 चौरस फुटाचे बांधकाम पाडले होते. शहरात अजूनही मोठ्या प्रमाणात अनधिकृत रुफटाॅप हॉटेल, पब, बार असल्याची चर्चा आहे. मात्र, यांना असलेला राजकीय वरदहस्त लक्षात घेऊन कारवाई होण्यास टाळाटाळ केली जात आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ही कारवाई आता पुढे चालू राहणार की नाही? याकडे सुद्धा लक्ष आहे. पुण्यामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत हॉटेल, पब, बारमुळे सर्वाधिक त्रास निष्पाप नागरिकांना होत असतानाही प्रशासनाचा सुस्तपणा संतापात भर टाकणारा आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रवीण दरेकर पुढचे सहकार मंत्री, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; आता, भाजपकडून स्पष्टीकरण
मोठी बातमी! प्रवीण दरेकर पुढचे सहकार मंत्री, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; आता, भाजपकडून स्पष्टीकरण
Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणाला इशारा
राज्यात उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणाला इशारा
पुण्यातील लोकसेवा ई-स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100 टक्के निकाल, 14 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
पुण्यातील लोकसेवा ई-स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100 टक्के निकाल, 14 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Gold : 2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले,अक्षय तृतीयेपूर्वी सोन्यात चढ-उतार; पुढे काय होणार, मोतिलाल ओसवालचा अहवाल काय सांगतो?
2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले, पुढं काय होणार,मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचा अहवाल काय सांगतो?
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
Embed widget