Pune Crime News: पॉक्सो गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या शिक्षकाने पुन्हा केलं राक्षसी कृत्य; पुण्याच्या निगडीतील धक्कादायक घटना
Pune Crime News: बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच असाच आणखी एक प्रकार निगडी येथे समोर आला आहे.
पुणे: बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच असाच आणखी एक प्रकार निगडी येथे समोर आला आहे. तेरा वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे (Crime News) केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेली दोन वर्षे हाच प्रकार सुरू होता, 21 ऑगस्टला याचीच पुनरावृत्ती झाली. यावेळी मुलीने घरी कळवलं त्यानंतर या शिक्षकाचे सर्व प्रताप समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे याच नराधम शिक्षकाने 2018 मध्ये शाळेतील एका मुलीशी असेच अश्लील चाळे केले होते, तेव्हा पॉक्सो (POCSO) अंतर्गत अटक झालेल्या आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या शिक्षकानेच हे कृत्य केलं आहे.
या घटनेतील आरोपी शिक्षकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर गुन्हा दाखल झाल्यानंतरही पुन्हा त्याला शाळेत घेतल्याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यासह ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनी अटक केली आहे. निवृत्ती देवराम काळभोर असं नराधम शिक्षकाचं नाव आहे, तर अशोक जाधव हे शाळेचे प्राचार्य आहेत, ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास बलभिम जाधव, अविंद्र अंकुश निकम, गोरख, सोपान जाधव, हनुमंत दादा निकम आणि महिला आरोपींना पोलिसांनी (Crime News) अटक केली आहे. तर, लक्ष्मण नामदेव हेंद्रे हा पसार आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद (Crime News) दिली आहे.
नेमकं काय अन् कधी घडलं?
निगडी येथे ही नामांकित शाळा आहे. या शाळेत पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी काळभोर हा शाळेत खेळाचा शिक्षक आहे. काळभोर हा पिडीत मुलीस वारंवार लैंगिक त्रास देत असे. पिडीत मुलीच्या वर्गातील विदयार्थ्यांना पिटीच्या क्लाससाठी ग्रांउडवर घेवून जात असताना व परत घेवून येत असताना पिडीत मुलीशी अश्लील चाळे (Crime News) करीत असे. तसेच, हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला खूप मारीन अशी धमकी देत असे. 21 ऑगस्ट रोजी पिडीत मुलगी ही वॉशरूम वरून बाहेर येत असताना काळभोर याने पुन्हा तिच्याशी अश्लील वर्तन (Crime News) केले. अखेर मुलीने घरच्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
'तू मला आवडतेस' शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला इंस्टाग्रामवर मेसेज
शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात स्कूल व्हॅन चालकाने मेसेज करुन मुलीची छेड काढल्याची (Pune Crime News) घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच मनसे कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅन चालकाला याचा जाब विचारत चांगलाच चोप दिला आहे. शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनीला 'तू मला आवडतेस' असे मेसेज केले होते. स्कूल व्हॅन चालक वारंवार प्रत्यक्ष आणि इंस्टाग्रामवर सतत मेसेज करून विद्यार्थिनीला त्रास देत होता. या घटनेनंतर पालकांनी संताप (Pune Crime News) व्यक्त केला आहे, आम्ही तुमच्या विश्वासावर आमच्या मुलींना शाळेत पाठवतो आणि तुम्ही अशी कृत्ये करता असं म्हणत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.