Tamhini Ghat Thar Accident: साहिल प्रचंड मेहनती, पुण्यात मोमोजच्या तीन गाड्या टाकल्या; आधी घर, मग थार घेतली, ताम्हिणी घाटात 500 फूट दरीत कोसळली
Tamhini Ghat Thar Accident: ताम्हिणी घाटात थार अपघातातील (Tamhini Ghat Thar Accident) सहा तरुणांचा मृत्यू झाला. सध्या 4 जणांचे मृतदेह रेस्क्यू करणाऱ्या टीमच्या हाती लागलेत उर्वरित दोघांचा शोध अजूनही सुरू आहे.

Tamhini Ghat Thar Accident: रायगडच्या ताम्हिणी घाटात थार अपघातातील (Tamhini Ghat Thar Accident) सहा तरुणांचा मृत्यू झाला असून हे सर्व तरुण 21 ते 22 वयोगटातील आहेत. सध्या 4 जणांचे मृतदेह रेस्क्यू करणाऱ्या टीमच्या हाती लागलेत उर्वरित दोघांचा शोध अजूनही सुरू आहे.
सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेकडून ही मृतदेह बाहेर काढले जात असून पोलीस देखील या बचाव कार्यात योग्य ती मदत करत असून थार कारमधील सर्व 6 तरुणांचा मृत्यू झाला. यामध्ये साहिल गोठे, शिवा माने, प्रथम चव्हाण, श्री कोळी, ओमकार कोळी, पुनीत शेट्टी या तरुणांचा समावेश आहे. ((Tamhini Ghat Thar Accident)
साहिल गोठेचा मोमोज बनवण्याचा व्यवसाय- (Sahil Gothe Tamhini Ghat Accident)
साहिल गोठे याने 20 दिवसांआधीच नवीन थार घेतली होती. तसेच साहिल गोठेचा मोमोज बनवण्याचा व्यवसाय होता. साहिल गोठेने पोटा-पाण्यासाठी त्याने मोमोजचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्याला प्रगतीही मिळत होती आणि त्याने पुण्यात तीन ठिकाणी मोमोजच्या गाड्या टाकून व्यावसाय वाढवला. प्रचंड मेहनत करून त्याने याच व्यवसायाच्या जोरावर गेल्या वर्षीच एक फ्लॅट विकत घेतला आणि सुमारे महिनाभरापूर्वीच थार गाडीही घेतली. (Tamhini Ghat Thar Accident Marathi News)
पुण्याहून कोकणात फिरायला निघाले अन्... (Tamhini Ghat Accident)
रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा ताम्हिणी घाट हा महत्वाचा दुवा समजला जातो. मात्र या घाटात वारंवार अपघात होण्याची घटना समोर येत आहेत. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील 6 तरुण आपल्या नवीन थार घेऊन कोकणात फिरण्यासाठी निघाले. मात्र मंगळवारी पहाटे या तरुणांची ही थार कार घाटातील एका 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली.
नेमकं काय घडलं? (Tamhini Ghat Accident)
ताम्हिणी घाटातील रस्ता अत्यंत वळणावळणाचा आणि दगडांनी भरलेला आहे. प्राथमिक तपासात, रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्यामुळं चालकाचे नियंत्रण सुटलं असावं, असं दिसून आलं आहे. या दुर्घटनेमुळे घाटातील सुरक्षित वाहनचालनाची गरज अधोरेखित झाली आहे. पोलीस या अपघाताचा सखोल तपास करत आहेत. या घटनेनंतर ताम्हिणी घाटातील प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं असून अपघातप्रवण रस्त्यावर आवश्यक सूचना व सतर्कतेचे उपाय करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत.

























