Tamhini Ghat Thar Accident: भावांनो, चला कोकणात...साहिल मित्रांना पहिल्यांदाच कोकण दाखवायला निघाला; ताम्हिणी घाटात थार कोसळली, 6 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Tamhini Ghat Thar Accident: रायगडच्या ताम्हिणी घाटात थार अपघातातील सहा तरुणांचा मृत्यू झाला असून हे सर्व तरुण 21 ते 22 वयोगटातील आहेत.

Tamhini Ghat Thar Accident: रायगडच्या ताम्हिणी घाटात थार अपघातातील (Tamhini Ghat Thar Accident) सहा तरुणांचा मृत्यू झाला असून हे सर्व तरुण 21 ते 22 वयोगटातील आहेत. अजूनही या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेकडून ही मृतदेह बाहेर काढले जात असून पोलीस देखील या बचाव कार्यात योग्य ती मदत करत असून थार कार मधील सर्व 6 तरुणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
रेस्क्यू टीमकडून रोपच्या सहाय्याने या तरुणांचे मृतदेह अजूनही बाहेर काढले जात आहेत. हे सर्व तरुण पुणे जिल्ह्यातील (Thar Accident Pune News) हवेली तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा ताम्हिणी घाट हा महत्वाचा दुवा समजला जातो मात्र या घाटात वारंवार अपघात होण्याची घटना समोर येत आहेत. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील 6 तरुण आपल्या नवीन थार घेऊन कोकणात फिरण्यासाठी निघाले. मात्र मंगळवारी पहाटे या तरुणांची ही थार कार घाटातील एका 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. (Tamhini Ghat Thar Accident Marathi News)
साहिल पहिल्यांदाच मित्रांना कोकण दाखवायला निघाला होता- (Tamhini Ghat Thar Accident)
साहिल हा गरिबीशी झुंज देऊन स्वतःची 'थार' घेणारा आणि पुण्यात 3-4 ठिकाणी 'मोमोज'चा व्यवसाय उभा करणारा मेहनती तरुण म्हणून परिसरात ओळखला जायचा. आपल्या जिवलग मित्रांना घेऊन तो पहिल्यांदाच कोकण फिरायला निघाला होता. अवघ्या 20 दिवसांपूर्वी साहिलने नवीन कोरी थार कार घेतली. साहिल आवडीने आपली कार घेऊन आपल्या मित्रांसमवेत कोकण दाखवण्यासाठी निघाला आणि वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडला. या अपघातामध्ये सहाही तरुणांचा मृत्यू झाला. सध्या 4 जणांचे मृतदेह रेस्क्यू करणाऱ्या टीमच्या हाती लागलेत उर्वरित दोघांचा शोध अजूनही सुरू आहे.
अपघातातील तरुणांची नावे- (Tamhini Ghat Thar Accident)
1) साहिल गोठे, वय- 24
2) शिवा माने, वय- 20
3) प्रथम चव्हाण, वय- 23
4) श्री कोळी, वय- 19
5) ओमकार कोळी, वय- 20
6) पुनीत शेट्टी, वय- 21
ताम्हिणी घाटात मोठी वाहतूक कोंडी- (Tamhini Ghat)
ताम्हिणी घाटातील अपघातात खोल दरीत कोसळलेला कारमधील मृत तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीम कडून रोप च्या सहाय्याचा वापर करावा लागत आहे. यासाठी रोप मुख्य रस्त्यावर बांधण्यात आल्यामुळे ताम्हिणी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिस प्रशासनाकडून पुणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्याच्या दिशेकडून वाहतूक थांबवून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवासी अडकून पडलेत.

























