एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

पुणे रेल्वे स्टेशनवरील संशयास्पद वस्तू स्फोटक नाही, पोलिसांच्या तपासातील प्राथमिक निष्कर्ष

पुणे रेल्वे स्टेशनवर आढळलेली संशयास्पद वस्तू ही स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय रेल्वे स्टेशनवरील वाहतूकही आता सुरु झाली आहे.

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर आढळलेली संशयास्पद वस्तू ही स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तासाभराने पुणे रेल्वे स्टेशवरील वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. काही वेळापूर्वी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्बसदृश वस्तू सापडल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यानंतर ही वस्तू रेल्वे स्टेशनबाहेरच्या परिसरात नेण्यात आली. बॉम्ब शोधक नाशक पथकाने तपासणी केली असता ही संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ माजली होती. खबरदारी म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 पूर्णपणे रिकामे करण्यात आले होते. इतकंच नाही तर काही काळासाठी रेल्वे वाहतूकही थांबवण्यात आली होती. ही वस्तू नेमकी काय आहे याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही. 

"सापडलेली वस्तू ही जिलेटीन नव्हती. कोणीतरी जाता जाता ती वस्तू सोडून गेले असावेत. ही वस्तू फटाक्यांसारखी होती, पण ती मोकळी त्यात फक्त वायर होत्या," अशी माहिती जीआरपीएफच्या गुप्तचर विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याने दिली. 

सापडलेली वस्तू जिलेटीन किंवा डिटोनेटर नाही : पुणे पोलीस आयुक्त
यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता रेल्वे स्थानकात दाखल झाले असून त्यांनी परिसराची पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, "आज सकाळी साडेदहा वाजता रेल्वे पोलीस स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित वस्तू जिलेटीन किंवा डिटोनेटर नाही. ते स्फोटक नाही किंवा स्फोटकांसारखं मटेरियल देखील नाही. रेल्वे पुढील तपास करत आहोत. कोणीही घाबरण्याचं कारण नाही."

काय झालं पुणे रेल्वे स्टेशनवर? 
पुणे रेल्वे स्थानक परिसरात बॉम्बसदृश वस्तू असल्याची माहिती पोलिसांना सकाळी साडेदहाच्या सुमारास मिळाली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉड पथकही घटनास्थळी दाखल झालं. खबरदारी म्हणून पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2  रिकामे करण्यात आले. तसंच येणाऱ्या गाड्यांना यार्डमध्ये थांबवण्यात आलं होतं. संबंधित संशयास्पद वस्तू रेल्वे स्टेशनमधून बाहेर मैदानावर नेली आणि त्याची तपासणी केली. 

दरम्यान चार ते पाच दिवसांपूर्वी पुणे नियंत्रण कक्षात निनावी कॉल आला होता, ज्यात पुणे रेल्वे परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. तपास केला असता तो फेक कॉल असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आज पुणे रेल्वे स्टेशन परिसरात संशयास्पद वस्तू आढळली. सुदैवाने ही वस्तू स्फोटक नसल्याने सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget