एक्स्प्लोर

Supriya Sule: ईडी सरकार हे इंग्रजांचं सरकार वाटतंय : सुप्रिया सुळेंची जहरी टीका

इडी सरकार हे इंग्रजांचे सरकार वाटत आहे. जनरल डायरने जसा अन्याय केला तसा अन्याय हे सरकार करत आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Supriya Sule :  "ईडी सरकार हे इंग्रजांचे सरकार वाटत आहे. जनरल डायरने जसा अन्याय केला तसा अन्याय हे सरकार करत आहे. तसे जनरल डायर या देशात आले आणि त्यांनी ठरवले आहे महाराष्ट्रचे तुकडे करायचे. त्याचप्रमाणे सध्या महाराष्ट्रात कारभार सुरु आहे," अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला आहे. सुप्रिया सुळे या दौंड तालुक्यातील गावांच्या दौऱ्यावर आहेत. दौंड तालुक्यातील मळद गावात भेट दिली त्यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. 

'हे सरकार निवडणुकांपासून पळवाटा काढताय'
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर जात आहे. यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. प्रतिनिधी किंवा नगरसेवक हा सगळ्यांच्या रोजच्या सुखदु:खात असतो. ही निवडणूक तातडीने घेतलीच पाहिजे, असं आमचं मत आहे. कारण आज सर्वसामान्य जनतेला प्रचंड अडचण होते. निवडणुकांबाबत झालेल्या सर्व्हेमध्ये राज्य सरकारला फारसं यश दिसत नाही आहे, असं सरकारच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे हे सरकार निवडणुकांपासून पळवाटा काढत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

'नवले पुलावरील अपघाताचं सत्र थांबायला हवं'
पुण्यातील नवले पुलावरील अपघाताची मालिका थांबली पाहिजे. गडकरी साहेबांनी जवळपास 18 ते 20 गोष्टी सुचवल्या त्याने ते बदल घडून आले होते आणि सहा महिन्यांमध्ये पहिल्यापेक्षा अपघात कमी झाले होते. गेल्या दोन चार दिवसात पुन्हा अपघात झाले. मी गडकरींना ट्विटरच्या माध्यमातून आणि त्यांच्या ऑफिसलाही संपर्क केला आहे. कलेक्टर प्रशासनाच्या सगळ्यांच्या संपर्कात आम्ही आहोत. तो शून्य आणि 100 टक्के सेफ्टीझोन हा झाला पाहिजे असा आग्रह असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. 

'शेतकऱ्यांची वीज अमानुष पद्धतीने ही तोडली जाते'
हे शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे. या सरकारने तीन काळे कायदे केले होते आणि ते निर्णय या सरकारला ते मागे घ्यावे लागले. तसेच कांद्याचा भावावरुन सरकर शेतकऱ्यांवर अन्याय करते आहे. शेतकऱ्यांची वीज अमानुष पद्धतीने ही तोडली जाते ही अतिशय दुर्दैव आहे. त्याचा मी जाहीर निषेध करते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कालपासून यांच्याविरोधात आंदोलन करायला सुरुवात केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

दिशा सॅलियनबाबत गलिच्छ राजकारण
दिशा सॅलियन प्रकरणात गलिच्छ राजकारण सुरु केलं आहे. एखादं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचे पाप हे सरकार करत आहे. ही महाराष्ट्रची संस्कृती नाही आहे. मात्र हे सातत्याने करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget