एक्स्प्लोर

बारामतीतून सुनेत्रा पवार तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील जवळपास फायनल, आढळरावांची राष्ट्रवादी प्रवेशाची तयारी पूर्ण

शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. शिरूर मतदारसंघात त्यांचं पारडं जड असल्याने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) तर शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok sabha Election)  शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता केला जात आहे. पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्व्हे मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचं पारड जड असल्याने त्यांनाच संधी मिळणारं असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून त्याची तयारीही झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

राष्ट्रवादी पक्षाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावावर लवकरच शिक्कमोर्तब होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील आमदारांची आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असावा ही मागणी केल्याने आता आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेशाची तयारी केल्याची माहिती आहे. 

बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयामध्ये लढत

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे या लढणार असल्याचं स्पष्ट आहे. त्यांच्याविरोधात आता अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. बारामतीमध्ये त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसली तरीही त्यांचं नाव अंतिम झाल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नणंद विरूद्ध भावजया अशीच लढत पाहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवारांनी बारामतीमध्ये गाठीभेटी घ्यायला सुरूवात केली आहे. 

शिरूरमध्ये कोल्हेंना पाडण्याचा अजित पवारांचा निश्चय

राज्यातील हाय होल्टेज निवडणुकींमध्ये शिरूर मतदारसंघाचा समावेश होतो. कारण या ठिकाणचे खासदार अमोल कोल्हे हे शरद पवारांच्या सोबतीने आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी कोणत्याही परिस्थितीत पाडणार असा निश्चय अजित पवारांनी केला आहे. अजित पवारांनी या मतदारसंघावर दावा केला असून त्या ठिकाणी त्यांनी गाठीभेटीही सुरू केल्या आहेत. 

शिरूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शिवाजीराव अढळराव पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. अजित पवारांकडे सध्या तरी कोणताही उमेदवार नसल्याने अढळरावांनी राष्ट्रवादीमध्येर प्रवेश करण्याची तयारी ठेवली आहे आणि त्या माध्यमातून निवडणुकीचीही तयारी सुरू केली आहे.

या आधी अढळरावांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट केल्याचं सांगितलं जात होतं. पण आता अढळरावांनी थेट राष्ट्रवादीच्या प्रवेशाची तयारी केल्याने या ठिकाणाहून त्यांचं नाव अंतिम झाल्याचं सांगितलं जातंय.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget