pune ganeshotsav 2023 : पुणेकरांनो बाप्पाच्या दर्शनासाठी जाताय? मग हा रोड मॅप अन् पार्किंगची ठिकाणं पाहून घराबाहेर पडा!
पुणे शहर पोलिसांनी सर्वसमावेशक गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप जारी केला आहे. त्यामुळे आता पुण्यात आलेल्या गणेशभक्तांना आपल्या आवडत्या गणपतीजवळ पोहचणं सोपं होणार आहे.
पुणे : गणेशोत्सवादरम्यान(Pune ganeshotsav 2023) पुण्यात देशभरातून नागरिक येत असतात. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान नागरिकांची सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे. पुणे शहर पोलिसांनी सर्वसमावेशक गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप जारी केला आहे. त्यामुळे आता पुण्यात आलेल्या गणेशभक्तांना आपल्या आवडत्या गणपतीजवळ पोहचणं सोपं होणार आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, "गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅपमध्ये महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश आहे. ज्यात शहरातील रस्त्यांंबाबत माहिती दिली आहे. कोणते रस्ते बंद आणि कोणते सुरु हेदेखील सांगण्यात आलं आहे. शिवाय पर्यायी मार्गांची देखील माहिती उपलब्ध करुन दिली आहे."
पुण्यात गणेशोत्सवादम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. शिवाय अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे चेंगराचेंगरी होते. त्यामुळे अनेकदा सोहळ्याला गालबोट लागण्याची शक्यता असते. त्यातच अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करणे आणि सणासुदीच्या काळात सुरळीत वाहतूक ठेवण्यासाठी हा रोड मॅप जारी करण्यात आला आहे.
पोलीस मदत कक्ष कुठे आहे, याची माहितीदेखील या रोड मॅपमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे काही अनुचित घडल्यास नागरिकांना थेट आणि लवकर पोलिसांपर्यंत पोहचणं शक्य होणार आहे. त्यामुळे या मॅपचा वापर करा आणि सुरळीत आणि आनंदाने बाप्पाचं दर्शन घ्या, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
पार्किंगची व्यवस्था कुठे आहे?
पुणे शहरात गणेशोत्सवात अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातली 26 ठिकाणी पार्किंग स्टँड उभारण्यात आले. 27 सप्टेंबरपर्यंत पोलीसांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी गाड्यांची पार्किंग करता येणार आहे.
दुचाकीसाठी वाहनतळ
- न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग
- देसाई महाविद्यालय (पोलिसांच्या वाहनांसाठी)
- गोगटे प्रशाला
- स.प. महाविद्यालय
- शिवाजी मराठा विद्यालय
- नातूबाग
- सारसबाग, पेशवे पार्क
- हरजीवन रुग्णालयासमोर, सावरकर चौक
- पाटील प्लाझा पार्किंग
- मित्रमंडळ सभागृह
- पर्वती ते दांडेकर पूल
- दांडेकर पूल ते गणेश मळा
- गणेश मळा ते राजाराम पूल
- विमलाबाई गरवारे हायस्कूल
- आपटे प्रशाला
- मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय
- एसएसपीएमएस महाविद्यालय
मोटारींसाठी वाहनतळ
- शिवाजी आखाडा वाहनतळ
- हमालवाडा, पत्र्या मारुती चौकाजवळ
- नदीपात्रालगत
- पीएमपी मैदान, पूरम चौकाजवळ
- नीलायम टॉकीज
- आबासाहेब गरवारे महाविद्यालय
- संजीवन वैद्यकीय महाविद्यालय
- फर्ग्युसन महाविद्यालय
- जैन वसतिगृह, बीएमसीसी रस्ता.
इतर महत्वाच्या बातम्या
Pune Ganeshotsav 2023 : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरासमोर अथर्वशीर्ष पठणात परदेशी पाहुणे तल्लीन