(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Siddhu Moosewala Murder case: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या संतोष जाधवला पुणे पोलिसांनी कसं पकडलं?
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलीसांनी गुजरात राज्यातील कच्छ मधून अटक केलीय.
Siddhu Moosewala Murder case: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलीसांनी गुजरात राज्यातील कच्छ मधुन अटक केलीय. संतोष जाधवसोबतच त्याच्या सूर्यवंशी नावाच्या आणखी एका साथीदाराला ही पोलीसांनी अटक केलीय. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्या प्रकरणात या दोघांची नावे पुढे आली होती. अखेर पुणे पोलिसांना त्या दोघांना जेरबंद करण्यात यश आलं आहे. या दोघांना रात्री बारा वाजता न्यायाधीशांसमोर त्यांच्या घरी नेऊन हजर करण्यात आलं असता त्यांना 20 जुन पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
पुणे पोलिसांनी संतोष जाधवला कसं पकडलं?
संतोष जाधव हा गुजरातला त्याचा साथीदार नवनाथ सुर्यवंशी याच्याकडे जाऊन लपला होता. पुणे ग्रामीण पोलीसांची टीम गुजरातमधील भुज जिल्ह्यातील मांडवी गावात पोहचली. तिथे त्यांना नवनाथ सूर्यवंशी सापडला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आधी माहिती देण्यास नकार दिला. मात्र पोलीसांनी त्यांच कौशल्य वापरल्यावर त्याने संतोष जाधवला मांडवी गावाजवळील नागोर गावात लपवलं असल्याच सांगितल. संतोष जाधवला वेगळी खोली घेऊन देण्यात आली होती. तिथे त्याच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. ओळख लपविण्यासाठी संतोष जाधवने डोक्याचे टक्कल केले होते. त्याचबरोबर त्याने त्याचा पेहराव देखील बदलला होता. मात्र पुणे ग्रामीण पोलीसांनी त्याला तो राहत असलेल्या ठिकाणी छापा टाकून पकडले.
संतोष जाधव आणि सिद्धेश कांबळे हे लॉरेन्स बिष्णोई टोळीत सहभागी झाले होते. मात्र सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष जाधवचा काय रोल होता हे याचा तपास केला जाणार आहे. गुजरात बरोबरच दिल्ली आणि दिल्लीतही पुणे ग्रामीण पोलीसांच्या टीम्स संतोष जाधवचा शोध घेत होत्या. सलमान खानला देण्यात आलेल्या धमकी बाबत सिद्धेश कांबळे ला माहिती होती. नवनाथ सुर्यवंशी हा सातारा जिल्ह्यातील वडूजचा राहणारा आहे आणि गेल्या काही वर्षांपासून तो गुजरातमधे काम करतो. संतोष जाधवच्या तेजस शिंदे या साथीदाराचा शोध सुरु आहे. महाराष्ट्रातील आणखीही काही तरुण लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आहेत.
हे तरुण सोशल मिडीयाच्या माध्यमातून बिष्णोई टोळीकडून प्रभावित झाले आणि गुन्हेगारीकडे ओढले गेले होते. त्याचबरोबर हे तरुण संपर्कासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करायचे. सलमान खानला देण्यात आलेल्या धमकीची माहिती सिद्धेश कांबळेने दिली आहे.. त्या माहितीची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. त्यासाठी पुणे पोलीसांची एक टीम दिल्लीत लॉरेन्स बिष्णोईची चौकशी करण्यासाठी उपस्थित आहे. सिद्धू मुसेवाला आणि सलमान खानला देण्यात आलेल्या धमकीमधे संतोष जाधवचा काय रोल आहे?, याचाही तपास करण्यात येणार आहे. संतोषच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक तरुण लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आहेत, असंही सांगण्यात येत आहे.
पंजाब, दिल्ली आणि मुंबई पोलीस शोध घेत होते
राण्या बाणखेले नावाच्या गुडांचा खुन केल्यापासून संतोष जाधव चर्चेत होता. त्यानंतर मुसोवाला हत्या प्रकरणात संतोषचं नाव पुढे आलं. राण्या बाणखेलेच्या खूनानंतर तो उत्तर भारतातील लॉरेन्स बिष्णोई टोळीत सामील झाला होता. त्याचबरोबर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल देखील त्याच नाव घेण्यात आलं. त्यामुळे पंजाब, दिल्ली आणि मुंबई पोलीसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला. त्यासाठी या वेगवगेळ्या राज्यातील पोलीस पुण्यात तळ ठोकून आहेत. मात्र पुणे ग्रामीण पोलीसांच्या पथकाने गुजरातमधील कच्छ मधुन त्याला अटक करण्यात यश मिळवलंय. काही दिवसांपुर्वी पुणे ग्रामीण पोलीसांनी सौरभ महाकाळ या त्याच्या साथीदाराला ही अटक केली होती.
अनेक दिवस फरार होता
गेल्या 1 ऑगस्टला संतोषने ओंकार उर्फ राण्या बाणखेलेची हत्या केली होती. या हत्येनंतर संतोष त्याच्या साधीदारासह फरार झाला होता. याच प्रकरणासाठी गेले अनेक दिवस मंचर पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तेव्हापासून तो फरार होता. त्याच्यावर मोक्कासुद्धा लावण्यात आला होता. त्याच्या आतापर्यंत अनेक चोऱ्या, मारामारी यासंदर्भातील गुन्हे दाखल आहे. मात्र आता त्याचं नाव सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात देखील समोर आलं आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीत सामील झाल्यानंतर खंडणी वसूल करण्यासाठी काही दिवसांपुर्वी त्याने राजस्थानमधील गंगापूर शहरातील एका व्यापाऱ्यांवर गोळीबार केला होता.