Pune Science Film News: पोरानं नाव काढलं! पुण्याच्या सिध्दार्थ दामलेच्या महितीपटाला इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सिल्व्हर बीव्हर अवॉर्ड'
पुण्यातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मधील मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी आणि युवा दिग्दर्शक सिध्दार्थ बाळकृष्ण दामले याच्या 'जिवो जिवस्य जीवनम् ' या माहितीपटाला अकराव्या इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिल्व्हर बीव्हर अवॉर्ड मिळाला आहे.
![Pune Science Film News: पोरानं नाव काढलं! पुण्याच्या सिध्दार्थ दामलेच्या महितीपटाला इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सिल्व्हर बीव्हर अवॉर्ड' siddharth damle documentary aworded for india national science film festival silver bivhar aword Pune Science Film News: पोरानं नाव काढलं! पुण्याच्या सिध्दार्थ दामलेच्या महितीपटाला इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सिल्व्हर बीव्हर अवॉर्ड'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/16/a145599716453c1f8ac18242eeb65bf01663318618576442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Science Film News : पुण्यातील (Pune News) गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधील मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी आणि युवा दिग्दर्शक सिद्धार्थ बाळकृष्ण दामले (Siddharth Dammle) याच्या 'जिवो जिवस्य जीवनम्' या माहितीपटाला अकराव्या इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (National Science Film Festival of India) सिल्व्हर बीव्हर अवॉर्ड मिळाला आहे. हा फेस्टिव्हल भोपाळ शहरात पार पडला. सिद्धार्थ बाळकृष्ण दामले याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. प्रत्येक क्षेत्रात पुण्यातील विद्यार्थ्यांनी आपलं नाव कमावलं आहे. यात आता सिद्धार्थ बाळकृष्ण दामले याच्या नावाचा समावेश झाला आहे.
महितीपट नक्की कशावर आधारित आहे?
परसबागेतील बुलबुल पक्ष्याच्या जोडीकडून घरट्याची निर्मिती करतानाची प्रक्रिया कॅमेऱ्यात कैद केली आहे. अनेक दिवस ही प्रक्रिया कॅमेऱ्यात कैद करत होता. एक दिवस अचानक त्यावर बहिरी ससाण्याचा हल्ला, उरलेल्या अंड्यातून होणारे प्रजनन, पुढे जाणारे जीवन हे सगळं कॅमेऱ्यात कैद केली आहे. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहिरी ससाण्याचा हल्ला हा दुर्मिळ मानला जाणारा शॉट कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याच्या माहितीपटाची इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगर चे सदस्य डॉ. बाळकृष्ण दामले यांची निर्मिती असून मोहिनी दामले, मिलिंद पाटील यांनी माहितीपटासाठी संशोधन केले. राजश्री गोखले यांनी निवेदन केले असून तांत्रिक बाजू वासिम पठाण यांनी सांभाळली आहे.
सिद्धार्थ बाळकृष्ण दामले हा पुण्यात डिप्लोमा करतो आहे. त्याचे वडिल डॉ. बाळकृष्ण दामले हे दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात काम करतात. त्याच्या वडिलांनी अमेरिकेतील नामवंत अकॅडमीतून शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे लहानपणीपासून चित्रपटाचं बाळकडू मिळालं. वडिलांबरोबर त्याने लहानपणापासून विविध विषयांवरच्या फिल्ममध्ये काम केलं आहे. त्यामुळे मोठं झाल्यावर त्याने फिल्ममेकिंग करण्याचा निर्णय घेतला. मुलाने केलेल्या या माहितीपटाची देश पातळीवर निवड झाली. मला लहानपासून चित्रपटाची आवड आहे. त्यामुळे मी त्याचं शिक्षण घेतलं. याचा उपयोग माझ्या मुलाने नक्की चांगल्याप्रकारे केला. त्यामुळे मला त्याचा कायम अभिमान वाटतो, असं सिद्धार्थचे वडिल सांगतात.
इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल
इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल हे फिल्म फेस्टिव्हल विज्ञानावर आधारित नव्या प्रयोगांवरील माहितीपटासाठी भरवण्यात येतं. विज्ञानात वेगवेगळे प्रयोग व्हावे, तरुणांना संशोधन आणि विज्ञान क्षेत्रातील विविध विषयांवर मोकळे पणाने काम करता यावं, त्यागोष्टी प्रेक्षकांना सहज सोप्या रितीने कळाव्या, असा या फेस्टिव्हलचा हेतू आहे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)