(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्यापासून पुण्यातील दुकाने सुरू; P-1, P-2 पद्धत रद्द
लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद होती. आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पुणे : येत्या 5 ऑगस्टपासून सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. लॉकडाऊनमध्ये शहरातील सर्व दुकाने पी-1 आणि पी-2 या पद्धतीने सुरू होती. त्यामुळे आता आठवड्यातील सर्व दिवस दुकाने सुरू राहणार आहे. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद होती. आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अनलॉक-1 मध्ये दुकाने उघडण्यात आली. मात्र, रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी आणि दुसऱ्या बाजूची दुसऱ्या दिवशी अशी पी1 - पी-2 पद्धत अंवलबण्यात आली होती. उद्यापासून पुण्यातील मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि हॉटेल्स देखील आवश्यक ती खबरदारी घेऊन उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉल्समधील थिएटर मात्र सुरू होणार नाहीत. फूड मॉलमधील हॉटेल्स फक्त घरपोच जेवण देऊ शकतील.
पिंपरी चिंचवडमध्ये मात्र सम-विषमचे निर्बंध कायम
पुण्यातील दोन्ही बाजूंची दुकानं खुली राहणार असली तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र सम-विषमचे निर्बंध कायम ठेवण्यात आलीत. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तूर्तास तरी हा नियम हटविलेला नाही. याबाबत लवकरच निर्णय घेऊ अशी आयुक्तांनी माहिती दिलेली आहे.
Lear Corporation Pimpri | पिंपरीत एकाच कंपनीतील 110 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, कंटेन्मेंट झोनमधील कर्मचारी बोलावल्याने संकट