एक्स्प्लोर

Baramati News: बारामती लोकसभेत सेना विरुद्ध सुळे? पालिका अन् स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर मविआतील नाराजी नाट्य समोर

Baramati News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी डोळ्यासमोर असताना महाविकास आघाडीतील हे नाराजी नाट्य समोर आला आहे.

बारामती: गरज सरो आणि वैद्य मरो अशी अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आता हीच म्हण राजकारनात तर सर्रास लागू होते.  लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचे जीव ओतून काम केलं. परंतु सुप्रिया सुळे यांनी आता दुर्लक्ष केली असल्याची तक्रार घटक पक्षच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे केली आहे. पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड या भागातील कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांची तक्रार संजय राऊत यांच्याकडे करण्यात आलेली आहे. आणि तक्रार करताच सगळ्या कार्यकर्त्याची मिटिंग सुप्रिया सुळे लावणार असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे.  त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी डोळ्यासमोर असताना महाविकास आघाडीतील हे नाराजी नाट्य समोर आला आहे.

काही महिने पाठीमागे जाऊन बघितल्यास बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलं होतं. ननंद विरुद्ध भावजय अशी लढत या बारामती लोकसभा मतदारसंघात होत होती. निवडणूक अत्यंत चुरशीची होती आणि प्रत्येक कार्यकर्ता आपला युतीधर्म पाळण्याचा प्रयत्न करत होता. सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केल सुप्रिया सुळे निवडून आल्या आणि सुप्रिया सुळे यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं अशी तक्रार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे केले आहे.

सुषमा अंधारे यांनी अशी तक्रार करताच अशी माहिती मीडियात देताच सुप्रिया सुळे यांनी सावध पवित्रा घेत लवकरच महाविकास आघाडीची तसेच जे नाराज आहेत त्यांची एकत्र बैठक घेणार असल्याची माहिती एबीपी माझाशी बोलताना दिली. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील चार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार असल्याचं सुषमा अंधारे यांचे म्हणणं आहे. इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर या विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. 

परंतु ही नाराजी का आहे हे शोधून काढण्यासाठी सुप्रिया सुळे देखील पुढे सरसावल्या आहेत. परंतु जर सुषमा अंधारे यांनी मला आधी सांगितलं असतं तर याचविषयी मी आधीच बोलले असतं असा खोचक टोला देखील सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. 

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या पुढे घरातूनच आव्हान देण्यात आलं होतं. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांची भावजय सुनेत्रा पवार या उभ्या ठाकल्या होत्या. संपूर्ण यंत्रणा अजित पवारांसोबत होती सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील चार आमदार अजित पवारांच्या बाजूने होते. तर दोन आमदार सुप्रिया सुळे यांच्या महाविकास आघाडीतील अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील सुप्रिया सुळे यांचा विजय झाला.  आणि सुप्रिया सुळे दीड लाखाच्या फरकाने निवडून आल्या.

निवडून आल्यानंतर मित्र पक्षाची गरज संपली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे सामावून घेत नसल्याची तक्रार शिवसैनिकांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. आता सुप्रिया सुळे यांनी लवकरच या नाराज कार्यकर्त्यांची नैतिक जबाबदारी घेत बैठक देखील घेणार असल्याचं सांगितले. परंतु जर कार्यकर्त्यांना जर आधीच विश्वासात घेतलं असतं तर ही नाराजी निर्माण झाली असती का? बैठक घेऊन देखील त्यांची नाराजी दूर होईल का हा खरा प्रश्न आहे?

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकच्या येवला-नांदगाव रस्त्यावर लक्झरी बस पलटली; एक जण जागीच ठार, इतर प्रवासी किरकोळ जखमी
Maharashtra Live News Updates: नाशिकच्या येवला-नांदगाव रस्त्यावर लक्झरी बस पलटली; एक जण जागीच ठार, इतर प्रवासी किरकोळ जखमी
Pune Moshi Building Collapse: मोठी बातमी! अखेर मोशी दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, 'एबीपी माझा'ने पर्दाफाश केल्यानंतर आयुक्तांना जाग
मोठी बातमी! अखेर मोशी दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, 'एबीपी माझा'ने पर्दाफाश केल्यानंतर आयुक्तांना जाग
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
Maharashtra Weather Updates: पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती
पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget