(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut: "औरंगजेबाची खोदली तशीच भाजपची कबर महाराष्ट्रात खोदली जाईल", संजय राऊतांचा पुण्यात घणाघात
Sanjay Raut: औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात खोदली. तशीच भाजपची कबर महाराष्ट्रात खोदली जाईल, असा घणाघात संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केला आहे.
Sanjay Raut: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा आज (3 ऑगस्ट) पुण्यातील स्वारगेट परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पुण्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. या मेळाव्यातील पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात खोदली. तशीच भाजपची कबर महाराष्ट्रात खोदली जाईल, असा घणाघात त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.
"औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकायचा होता. महाराष्ट्र जिंकल्यावरच निवांतपणा येईल असं औरंगजेब म्हणायचा. पण औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात खोदली. तशीच भाजपची कबर महाराष्ट्रात खोदली जाईल. भाजप हा सतत काही ना काही गिळणारा पक्ष आहे. किती गिळाल असं शिवसेनाप्रमुख म्हणत असे, यावेळी शिवसैनिकांना जागं राहावं लागेल. भाजप हा गोंधळलेला पक्ष आहे", असेही संजय राऊतांनी (Sanjay Raut) म्हटलं आहे.
"महाराष्ट्र हे शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. औरंगजेबाची जन्मभूमी गुजरात आहे. औरंगजेबाचे व्यवहार आणि गुजरातीत चालत होते. औरंगजेबांना टोप्या विणण्याचा आणि विकण्याचा छंद होता. मोदींनाही असे अनेक छंद आहे. मोदी असेच जपताप करत असतात", असा घणाघात संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे.
पुण्यातील पूरस्थितीवर उध्दव ठाकरेंचं परखड भाष्य
आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यातील कामांना स्टे दिला होता. तो स्टे यांनी काढला, त्यांनी नदीच्या जागेवर कामे सुरू केली. हा विकास म्हणायचा हा विकास नाही विखार आहे अशा शब्दांत ठाकरेंनी (Uddhav Thackrey) हल्लाबोल केला आहे.
पुण्यातील नद्यांचे प्रवाह बदलण्याचा यांचा प्रयत्न आहे. नदी सुशोभीकरण प्रकल्पाला आपल्या सत्तेच्या काळात स्थगिती दिली होती. पण मोठ्या प्रमाणात नदीत राडारोडा टाकला जातोय. हा भाजपला झालेला सत्तेचा विकार आहे. ज्या कंत्राटदाराने संसद भवन बांधलं. तोच गुजरातचा कंत्राटदार पुण्यातील नदी सुशोभीकरण प्रकल्प करतोय. तो देखील गुजरातचा होता. पुणेकरांनी यासाठी रस्त्यावर उतरायला हवे, असंही यावेळी उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackrey) म्हटलं आहे.
'अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा'
"अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा आले होते. पुण्यात येऊन भाषण करुन गेले. त्यांना संघाचे हिंदुत्व मान्य आहे का? चंद्राबाबु नायडु, नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणसं आहेत का? असा सवाल त्यांनी केला.