एक्स्प्लोर

Sushma Andhare: तडीपार लोकांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, सुषमा अंधारेंचा शाहांवर हल्ला, फडणवीस फेक नरेटिव्हचं चालत-बोलतं केंद्र असल्याची टीका

Pune News: सुषमा अंधारे यांनी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा तडीपार म्हणून उल्लेख. अंधारेंच्या टीकेनंतर भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

पुणे: देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह हे दोघेही एकसारखंच अघळपघळ बोलतात. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील अधिवेशनात ज्याप्रकारे भूमिका मांडली ते पाहता फडणवीस (Devendra Fadnavis) हेच फेक नरेटिव्हचे सर्वात मोठे केंद्र असल्यासारखे वाटतात, अशी टिप्पणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली. अमित शाह (Amit Shah) आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या सगळ्या आरोपांना सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले.

भाजप पक्ष कायमच  हिंसा करतो. इथला हिंदू हिंसक नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणजे सकल हिंदू अशी भाजपची समजूत आहे. राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाला भाजप का खेळवत आहे? राज्यात जातीय विषपेरणी करू नका,आरक्षणाचा तोडगा काढा. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकसभेत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडावा. तुमची नियत मराठा समाजाला कळू द्या, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. 

तडीपार लोकांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये: सुषमा अंधारे

अमित शाह यांनी भाजपच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख औरंगजेब फॅन्स क्लबचे अध्यक्ष असा केला होता. त्याला उत्तर देताना सुषमा अंधारे यांनी म्हटले की, आम्हाला अमित शाह यांच्यावर बोलायचे नाही. तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपणा सांगण्याची गरज नाही. आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत? याचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपार माणसाकडून घेण्याची गरज वाटत नाही. आमचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपराकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही. ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग आहेत, त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट देऊ नये, , अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. 

शंकराचार्य मातोश्रीवर आल्यापासून तुम्हाला पोटशुल उठलं आहे. तुम्हाला आता मुद्दे मिळत नाहीत. अदानींच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली तेव्हा तुमची आर्थिक रसद तुटते का? असं वाटायला लागलं म्हणून औरंगजेब फॅन क्लब अशी भाषण करत आहात, तुमचा स्तर किती खाली गेला आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना विरोधी बाकावर बसण्यासाठी शुभेच्छा: सुषमा अंधारे

सुषमा अंधारे यांनी खोचक शैलीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या दोघांची जन्म तारीख १ एप्रिल असावी, त्यांच्या वागण्यातून ते दिसतं. फडणवीस गृहमंत्री आहे की ठोक मंत्री आहेत. कुंपणच शेत खात असेल तर कसं होणार, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा

पुण्यात अमित शाहांचं कसाबच्या मटण बिर्याणीबाबत वक्तव्य पण, उज्ज्वल निकमांच्या जुन्या व्हिडीओमुळे काँग्रेसने घेरलं

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Mira Bhayander : मिरा-भाईंदरमधील वाहतून कोंडी कशी सुटणार?
Delhi Blast : दिल्लीतील हल्ल्यामागे पाकचा हात? Pok च्या माजी पंतप्रधानाची मोठी कबुली
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेचं मैदान कोण मारणार?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbai : नवी मुंबई शहरात कोणते प्रश्न प्रलंबित? नागरिकांच्या नेमक्या समस्या काय?
Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil य़ांची औकात आहे का?; मिटकरी कडाडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
Embed widget