'राष्ट्रवादीने आढळरावांना आयात करण्यापेक्षा भाजपच्या...'; विलास लांडेंच्या खेळीने बारामतीपाठोपाठ शिरूरमध्येही अजित पवारांची कोंडी?
Shirur Lok sabha Constituency : अजित पवारांनी शिंदे गटातील शिवाजी आढळरावांना आयात करू नये. त्याऐवजी एकतर मला संधी द्यावी. अथवा थेट भाजपला जागा सोडावी असे माजी आमदार विलास लांडे यांनी म्हटले आहे.
Vilas Lande : शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok sabha Constituency) शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता केला जात आहे. आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार करणार असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच राष्ट्रवादी पक्षाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह आहेत. यावरून भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंनी (Vilas Lande) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांची (Ajit Pawar) कोंडी केल्याचे दिसून येत आहे.
अजित पवारांनी शिंदे गटातील शिवाजी आढळरावांना आयात करू नये. त्याऐवजी एकतर मला संधी द्यावी. अथवा थेट भाजपला जागा सोडावी असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे अजित पवार यांची बारामती पाठोपाठ शिरूर लोकसभा मतदारसंघातूनही कोंडी होणार असल्याचे चित्र आहे.
काय म्हणाले विलास लांडे?
गेली 35 वर्ष मी जनतेशी एकनिष्ठ राहिलो आहे. मी 2009 साली लोकसभा लढलो आहे. 2019 ला मला लोकसभा लढण्यास सांगण्यात आले. मी १० वर्ष आमदार होतो, महापौरही होतो. त्यामुळे मी कुठे कमी पडत आहे. माझी विनंती आहे की, आपल्याच पक्षातील उमेदवाराला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
महेश लांडगेना शिरूर लोकसभेच्या आखाड्यात उतरवावं
ते पुढे म्हणाले की, अजित पवारांनी शिंदे गटातील शिवाजीराव आढळरावांना (Shivajirao Adhalarao Patil) आयात करू नये. त्याऐवजी एकतर मला संधी द्यावी. अथवा थेट भाजपला जागा सोडून, महेश लांडगेंना (Mahesh Landge) शिरूर लोकसभेच्या आखाड्यात उतरवावं, आम्ही त्यांचे काम करू, असे विलास लांडे (Vilas Lande) यांनी म्हटले आहे.
बारामतीपाठोपाठ शिरूरमध्येही अजित पवारांची कोंडी
विलास लांडेंच्या या भूमिकेमुळे अजित पवारांची कोंडी झाल्याचे दिसून येते. बारामती पाठोपाठ आता शिरूर लोकसभेत ही अजित पवार कचाट्यात अडकणार हे स्पष्ट झालंय. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पुन्हा खासदार होऊ देणार नाही, असा चंग बांधलेल्या अजित पवार यांच्यासमोर आधी स्वपक्षीयांची नाराजी दूर करण्याचे आव्हान आता उभं ठाकल्याचे दिसून येते. त्यामुळे आता शिरूर लोकसभेची चुरस वाढणार असल्याचे दिसून येते.
इतर महत्वाच्या बातम्या