एक्स्प्लोर

Sharad Pawar: पुरुषांच्या मानसिकतेवर शरद पवारांनी व्यक्त केली खंत; म्हणाले, 'यापुढं मुलींनी आत्मविश्वासाने अन् कणखरपणे...'

Sharad Pawar: शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणावर भर देता येईल का? यावर शरद पवारांनी त्यांचं परखड मत मांडलं. ज्या घृणास्पद घटना घडल्या त्या सर्वांसमोर आहेत.

पुणे: बदलापूर अत्याचार (Badlapur Crime) प्रकरणाने अख्ख राज्य हादरलं आहे. महिलावर्ग स्वतःला असुरक्षित समजू लागलाय, पुरुषांची मानसिकता अन वाढत चाललेली विकृती याला कारणीभूत आहे. हाच प्रश्न एका विध्यार्थीने थेट शरद पवारांसमोर (Sharad Pawar) उपस्थित केला. शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणावर भर देता येईल का? यावर शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांचं परखड मत मांडलं. ज्या घृणास्पद घटना घडल्या त्या सर्वांसमोर आहेत. तातडीनं पावलं उचलणं गरजेचं असतं, जे होताना दिसलं नाही. एक धाक निर्माण करायला हवा. हे बोलताना पुरुषांच्या मानसिकतेवर पवारांनी (Sharad Pawar) ही खंत व्यक्त केली. आता यापुढं मुलींनी आत्मविश्वासाने अन कणखरपणे उभं व्हावं, तुमच्या हातात आलं तर तुम्ही सगळं करून दाखवलं आहे. असं म्हणत पवारांनी (Sharad Pawar) तरुणींना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. 

काय म्हणाले शरद पवार?

ज्या घृणास्पद घटना घडल्या त्या सर्वांसमोर आहेत. तातडीनं पावलं उचलणं गरजेचं असतं, जे होताना दिसलं नाही. एक धाक निर्माण करायला हवा. यापुढं मुलींनी आत्मविश्वासाने अन कणखरपणे उभं व्हावं, तुमच्या हातात आलं तर तुम्ही सगळं करून दाखवलं आहे, असंही शरद पवारांनी (Sharad Pawar) यावेळी म्हटलं आहे. 

अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट

आज शरद पवार (Sharad Pawar) हे उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुका दौऱ्यावर आहेत. शरद पवारांचा (Sharad Pawar) जुन्नर तालुक्यातील दौरा सुरू असताना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी भेट घेतली असून जुन्नरच्या राजकारणात ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे. आज झालेल्या या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अतुल बेनके (Atul Benke) तुतारी हाती घेणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

अतुल बेनकेंची शरद पवारांसाठी फ्लेक्सबाजी

आमदार अतुल बेनकेंनी (Atul Benke) आता थेट शरद पवारांच्या (Sharad Pawar) स्वागतासाठी फ्लेक्स झळकवले आहेत. आज जुन्नर विधानसभेत शरद पवार  (Sharad Pawar) आलेत, त्यांचं स्वागत अजित पवारांचे आमदार अतुल बेनके यांनी केलं आहे. इतकंच नव्हे तर नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar)  पोहचले, तेंव्हा स्वतः बेनके (Atul Benke) तिथं हजर होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?MVA Government : मविआ काळात फडणवीस, शिंदेंना अटक करण्याच्या कटाचा तपास SIT मार्फतSanjay Raut Delhi : एकनाथ शिंदे, अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही अशी शंका - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
Astrology : यंदाची संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांचा पुत्र मुख्य प्रतोद, प्रदेशाध्यक्ष पदासाठी 5 जण शर्यतीत
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांच्या मुलाला मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी कोण?
Embed widget