एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

पिस्तुलाने पाप, पिस्तुलानेच अंत; कुख्यात गुंड शरद मोहोळची भरदुपारी हत्या ते रात्री आरोपींना अटक, आतापर्यंत काय घडलं?

जे शस्त्र वापरून मोहोळने अनेकांचा गळा घोटला... तेच शस्त्र अखेरीस त्याच्या जिवावर बेतलं आणि त्याच शस्त्राने शरद मोहोळच्या पापाचा घडा फुटून गेलाय. 

पुणे :  मुळशी पॅटर्न नावाचा एक सिनेमा मागे प्रचंड गाजला. सिनेमातल्या कथेत हिंसेचं कारण जमिनीचा वाद असं दाखवलं असलं तरी दिवसाढवळ्या गोळीबार आणि भररस्त्यात गुंडांचा खात्मा... हे पुण्याच्या (Pune Sharad Mohol Murder)  परवलीचे शब्द बनले आहेत. त्याचंच एक उदाहरण  शुक्रवारी शरद मोहोळच्या समोर आलंय.  खंडणी, हत्या आणि दहशत माजवणे अशा सगळ्या काळ्या धंद्यात असलेल्या शरद मोहोळची (Sharad Mohol)  हत्या झाली. या प्रकरणाची सध्या राज्यभरात  सर्वत्र चर्चा सुरू आहे.  

सोशल मीडियावर हवा करणाऱ्या दहशत पसरवणाऱ्या हत्या, खंडणी, अपहरणाची सुपारी घेणाऱ्या शरद मोहोळचाी ज्या कोथरुडमध्ये  दहशत होती तिथेच भर दिवसा शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये.कोथरुडच्या सुतारदरा भागातील याच ठिकाणी शरद मोहोळवर गोळीबार झाला. दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मोहोळवर चार गोळ्या झाडल्या, यातील एक गोळी शरद मोहोळच्या खांद्याला लागली. त्याला उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पुढे ससून रुग्णालयात हलवण्यात आलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाल्याचं घोषीत करण्यात आलं. शरद मोहळवर हल्ला करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. हल्ला ते अटक गेल्या 24 तासात काय घडलं यावर नजर मारुया. 

आतापर्यंत काय घडलं?

  • शरद मोहोळने पत्नीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला. 
  • शरद मोहोळ त्याचे बॉडीगार्ड  विठ्ठल गांडले,  नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे घराबाहेर पडले
  • सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
  •  पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या,  एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागल्या
  • शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला. 
  • गोळ्या झाडणारे तीन मारेकरी नामदेव कानगुडे या त्यांच्या आणखी एका साथीदारासह सुतारदरा भागातून पळाले.
  • त्यांचे आणखी चार साथीदार त्यांच्यासाठी एक स्विफ्ट कार आणि एक एक्स व्ही यु गाडी घेऊन हजर होते. 
  • शरद मोहोळवर हल्ला झाल्याची माहती वाऱ्यासारखी पसरली. कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल
  • शरद मोहोळला सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले
  •  गंभीर जखमी असल्याने शरद मोहोळ याला तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आलं  
  • डॉक्टरांनी शरद मोहोळला मृत घोषीत केले.
  • शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्या तीन आरोपींपैकी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकरचे नाव समोर 
  • आर्थिक आणि जमिनीच्या वादातून शरद मोहोळ याचा खून झाल्याचे प्रर्थामिक चौकशीत समोर 
  • पुण्यातील खेड शिवापूर जवळील लपून बसलेल्या तरुणांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात 
  • या प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे त्याला पोलिसांनी पाठलाग करून शिरवळ जवळ ताब्यात घेतलं  
  • या आरोपींकडून तीन पिस्टल, दोन दुचाकी जप्त 
  • शरद मोहोळ खून प्रकरणात प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याला देखील पोलिसांनी केली अटक 
  • पोळेकर हा पळून जात असताना पुणे पोलिसांनी पाठलाग करून केली अटक 

शरद मोहोळच्या लग्नाचा शुक्रवापी वाढदिवस होता आणि त्याचदिवशी त्याच्या आयुष्याची दोरी कापली गेलीय. काहीच महिन्यांपूर्वी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राजकारण आणि गुन्हेगारी जगताच्या  हातमिळवणीचे प्रकार आधीही आपण पाहिलेत. त्यानुसार, स्वाती मोहोळ यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करणार अशीही चर्चा होती.  मात्र त्याआधीच त्याचा खेळ खल्लास झालाय. जे शस्त्र हाती धरून शरद मोहोळने दहशत माजवली, जे दाखवत मोहोळने खंडणी उकळली इतकंच काय, तर जे शस्त्र वापरून मोहोळने अनेकांचा गळा घोटला... तेच शस्त्र अखेरीस त्याच्या जिवावर बेतलं... आणि त्यात शस्त्राने शरद मोहोळच्या पापाचा घडा फुटून गेलाय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
Sanjay Raut: दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9  च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 06 June 2024 : ABP MajhaKolhapur Shivrajyabhishek 2024 : शाहू महाराजांच्या उपस्थितीत पार पडतोय शाही शिवराज्याभिषेक सोहळाAjit Pawar NCP Election Result 2024 : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पराभवानंतर अस्वस्थता?Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार; पंतप्रधान मोदी, अमित शाह यांची भेट घेणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
Sanjay Raut: दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; शरद पवार गटात परतण्याच्या चर्चांना उधाण
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; घरवापसीच्या चर्चांना उधाण
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
Sunil Lahri on BJP Ayodhya : अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
Embed widget