Satish Wagh Murder Case: 'सतीश वाघ वॉकिंगसाठी गेले पण...'; 9 डिसेंबरला सकाळपासून नेमकं काय काय घडलं? जाणून घ्या A टू Z घटनाक्रम
Satish Wagh Murder Case: 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या सतीश वाघ यांचा तो दिवस शेवटचा ठरला, तब्बल 72 वेळा भोसकून वार केला, आणि त्यांची हत्या केली, नेमकं काय काय घडलं?
पुणे: पुण्यात विधानपरिषद आमदार सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्या हत्येचा उलगडा पुणे पोलिसांनी केला आहे. सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांच्या पत्नीनेच मोहिनी वाघने आरोपींना पाच लाखांची सुपारी देऊन त्यांची हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ हिने होणारी मारहाण, संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधांच्या कारणास्तव ही हत्या घडवून आणल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी तिला पोलिसांनी बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा तपास करत असताना पहिल्या दहा दिवसांमध्ये पोलिसांनी सर्व माहिती गोळा केली. संबंधित आरोपींसोबतच अन्य देखील माहिती पोलिस गोळा करत होते, आधी पोलिसांनी सर्व माहिती गोळा केली त्यानंतर सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांना ताब्यात घेतलं आहे.(Satish Wagh Murder Case)
कसा आहे घटनाक्रम?
9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या सतीश वाघ यांचा तो दिवस शेवटचा ठरला, तब्बल 72 वेळा भोसकून वार केला, आणि त्यांची हत्या केली, नेमकं काय काय घडलं?
सकाळी 6:30: सतीश वाघ मॉर्निंग वॉक गेले त्यावेळी त्यांचे अपहरण झाले.
सकाळी 7:00: एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना पाहून सतीश वाघ यांच्या कुटुंबाला कळवले.
सकाळी 8:30: वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली.
सकाळी 9:00: गुन्हे शाखेचे पथकही तपासासाठी आले.
दुपारी 12:00: सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल टॉवर लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरू केला.
सायंकाळी 6:00: संधाकाळच्या सुमारास काहींना शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला, त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
रात्री 8:00: फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला. या दरम्यान सतीश वाघ याचे अपहरण केल्यानंतर वाघ यांच्या अंगावर 72 चाकूचे वार केले. सतीश वाघ यांचे गुप्तांग देखील कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
11 डिसेंबर 2024: संशयितांची चौकशी - पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली.
24 डिसेंबर 2024: मुख्य आरोपीला अटक - सतीश वाघ यांच्याकडे 2001 ते 2016 दरम्यान भाडेकरू म्हणून राहणाऱ्या अक्षय जावळकर याला धाराशिवमधून अटक करण्यात आली.
25 डिसेंबर 2024 : उलट तपासणीदरम्यान सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघने गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. अक्षय जावळकर याने देखील आपल्या गुन्ह्याची याची कबुली दिली.
सुपारी देण्यापूर्वी मोहिनीची आणखी एकाकडे केलेली विचारणा
सतीश वाघ यांना जीवे मारण्याची सुपारी अक्षयला देण्यापूर्वी मोहिनी वाघने आणखी एका ओळखीच्या व्यक्तीकडे पतीला संपवण्याबाबक विचारणा केल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे. तसेच, मोहिनीचा या प्रकरणात हात असलेले संशयास्पद पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. सतीश वाघ यांच्या सुपारीसाठी ठरलेल्या रकमेपैकी मोहिनेने काही रक्कम अक्षय जावळकरला दिल्याची माहिती आहे, हे पैसे कशाप्रकारे देण्यात आले. यासह सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांची हत्या करण्यामागे नेमकं आर्थिक कारण आहे की अन्य कोणतं कारण आहे, याचा तपास देखील पोलिस करत आहेत.