Satish Wagh Case: 'सतीश वाघ यांचेही बाहेर अनैतिक संबंध...', मोहिनी वाघचे पतीवर शारीरिक अन् मानसिक छळवणुकीचे आरोप, पोलिस तपासात माहिती उघड
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ हिने संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधांच्या संशयातून हत्या घडवून आणल्याचं पोलिस तपासात समोर आलं.

पुणे: पुण्यातील भाजप नेते आणि विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सादबा वाघ (वय 55) यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या (Satish Wagh Murder Case) करण्यात आली आहे. सतीश वाघ यांचं अपहरण करून चालत्या कारमध्ये चाकूने तब्बल 72 वार करून त्यांची हत्या केली होती. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच आरोपींना पाच लाखांची सुपारी देण्याची तयारी दाखवून त्यांची हत्या घडवून आणल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ हिने संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधांच्या संशयातून हत्या घडवून आणल्याचं पोलिस तपासात समोर आलं. दरम्यान या सर्व गोष्टी समोर आल्यानंतर आता पोलिस तपासावेळी मोहिनी सतीश वाघ हिने आपल्या पतीवरती बाहेर त्यांचे अनैतिक संबंध असल्याचे आणि छळवणुकीचे आरोप केले आहेत.(Satish Wagh Murder Case)
पोलिस तपासावेळी पती सतीश वाघ यांचेही बाहेर अनैतिक संबंध होते. माझाही तो गेल्या दहा वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करीत होता. हा सर्व त्रास असह्य होता, असा धक्कादायक खुलासा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली त्यांची पत्नी मोहिनी हिने काल झालेल्या पोलिसांच्या चौकशीत केला आहे. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.(Satish Wagh Murder Case)
सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने मोहिनीसह सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तपासात खुनातील आरोपी अतिश जाधव याच्या धाराशिव येथील घरामध्ये त्याचे रक्ताने माखलेले कपडे सापडले आहेत. सतीश यांचा काटा काढण्यासाठी अक्षय जावळकरला पाच लाख रुपये कसे दिले, याबाबतच्या तपासासाठी अक्षयची सर्व बँक खाती तपासण्यात आली आहेत. आरोपींकडून मिळत असलेल्या माहितीच्या आधारावर अधिक तपास केला जात आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी दिली आहे.(Satish Wagh Murder Case)
हत्यार भीमा नदीत फेकलं
सतीश वाघ हत्या प्रकरणातील आरोपी नवनाथ गुरसाळे व त्याचा साथीदार आरोपी अतिश जाधव या दोघांनी मिळून वाघ यांच्या खुनासाठी वापरलेले हत्यार हे पेरणे फाटा येथे भीमा नदी पात्रामध्ये फेकून देण्यात आले आहे. दोन्ही आरोपींच्या माध्यमातून त्या हत्याराचा शोध घेऊन ते जप्त करणार असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.(Satish Wagh Murder Case)
वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकलं
नऊ डिसेंबर रोजी सकाळी सव्वासहाच्या सुमारास सतीश वाघ मॉर्निंग वॉकला गेले असताना त्याचवेळी फुरसुंगी फाटा परिसरातून नंबरप्लेट नसलेल्या चारचाकी गाडीतून चौघांनी त्यांचे अपहरण केले होते. याप्रकरणी सतीश यांचा मुलगा ओंकार वाघ (वय 27) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. वाघ यांच्या अपहरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. मात्र, सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं. सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले होते, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
