Sassoon Hospital : लाच खाऊन रक्ताचे सॅम्पल कचऱ्यात फेकणाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती होताच 'ससून'चे डीन विनायक काळेंनी पळ काढला
तावरेला अधीक्षक पदाचा कार्यभार द्यावा अशी विनंती करणारे पत्र आमदार सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना दिले होते. त्यावर कार्यवाही करावी असे निर्देश मंत्र्यांनी दिले होते, असे ते म्हणाले.
पुणे : बिल्डर विशाल अग्रवालच्या पोराला गुन्ह्यातू वाचवण्यासाठी लाखो रुपये ब्लड सॅम्पल कचऱ्यात टाकून देणाऱ्या ससून हाॅस्पिटलमधील वैद्यकशास्त्र विभाागाचा डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळवरून प्रश्नांची सरबत्ती सुरु झाल्यानंतर पत्रकार परिषद सोडून डीन विनायक काळे यांनी काढता पाय घेतला. आरोपी तावरेच्या संदर्भात प्रश्नांची उत्तरे न देता डीन विनायक काळे तडक उठून निघून गेले.
तावरेची शिफारस आमदार टिंगरेंकडून
तत्पूर्वी, कारवाई संदर्भात बोलताना विनायक काळे यांनी सांगितले की, डॉ. श्रीहरी हळनोरची सेवा समाप्त करण्यात आली आहे. शवविच्छेदन विभागातील अतुल घटकांबळेला निलंबित करण्यात आलं आहे. तसेच डॉ. अजय तावरेच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. डॉ. तावरेला अधीक्षक पदाचा कार्यभार द्यावा अशी विनंती करणारे पत्र आमदार सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना दिले होते. त्यावर कार्यवाही करावी असे निर्देश मंत्र्यांनी दिले होते. डॉ. तावरे यांच्या प्रकरणाला मी जबाबदार नाही, असेही काळे यांनी सांगितले.
काळे यांनी तावरेवर बोलताना सांगितले की, डॉ. तावरे प्राध्यापक असल्याने विभाग प्रमुख पदासाठी पात्र होते. म्हणून मी त्यांना पदभार दिला. त्यांच्यावर यापूर्वी झालेल्या आरोपांची शासनाला कल्पना आहे. डॉक्टरांना अटक करण्यात आल्याचं मला पहिल्यांदा 27 तारखेला कळालं. मी सकाळी 9 पासून रात्री 10 वाजेपर्यंत बसून काम करतो. परंतु दुर्दैवाने अशा घटना घडतात.
पीएम रिपोर्टसाठी पैसे घेतले जातात?
दरम्यान, ससूनमध्ये 1400 पीएम रिपोर्ट पेडिंग असल्याचे काळे यांनी सांगितले. याबाबत माहिती घेऊन पीएम रिपोर्टसाठी पैसे घेतले जातात, या तक्रारीबाबत चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले. ससूनमध्ये दिवसाला सरासरी 24 मृत्यू होतात, अशी माहिती आजच कळाली आहे. इतर सरकारी हॉस्पिटलमध्ये काय परिस्थिती आहे याची माहिती घेऊन ससूनमधील रुग्णांच्या मृत्यूबाबतचा तपशील सांगणार असल्याचेही ते म्हणाले.
निलंबनाच्या कारवाईचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांना
दरम्यान, डॉ. श्रीहरी हरनोळ आणि शिपाई घटकांबळेच्या निलंबनाचा अहवाल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मनोहर हिरे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे गेले आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या निलंबनाच्या अहवालावर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची सही झाल्यानंतर निलंबनाची कारवाई पूर्ण होणार आहे. मात्र, डॉ. अजय तावरेवर मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतरच निलंबनाची कारवाई पार पडणार आहे. अजय तावरे क्लास वन अधिकारी असल्याने त्याच्या निलंबन कारवाईचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांना असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या