एक्स्प्लोर

Sanjay Rathod: 'संजय राठोडांचा काळा डाग एकनाथ शिंदेंच्या कपाळी...', पुण्यात बॅनरबाजी; हाच का महायुतीचा न्याय म्हणत उपस्थित केले सवाल

Sanjay Rathod: आमदार संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे, त्यानंतर आता पुण्यात त्यांच्या नावाला विरोध दर्शवण्यात आला आहे.

पुणे: महायुती सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार रविवारी (15 डिसेंबरला) नागपुरात पार पडला. एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीच्या मंत्रिमंडळात तब्बल 25 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपमधून विरोध होत असताना देखील आमदार संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे, त्यानंतर आता पुण्यात त्यांच्या नावाला विरोध दर्शवण्यात आला आहे,
'राठोडचा डाग शिंदेंच्या कपाळी' अशा प्रकारचे मजकूर लिहून कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या चेहऱ्यावरती क्रॉसफुली मारून पुण्यात निषेध बॅनर लावण्यात आले आहेत.

एकीकडे स्त्रियांसाठी लाडकी बहीण तर दुसरीकडे एका निष्पाप महिलेच्या हत्येचा आरोप असणाऱ्या आमदारास कॅबिनेट मंत्रीपद असा मजकूर यावर लिहिण्यात आला आहे. बॅनर कोणी लावले त्याचं नाव मात्र यावरती लिहण्यात आलेलं नाही. मात्र, महायुती सरकार हाच का तुमचा न्याय अशा प्रकारचे बॅनर रस्त्याच्या मधोमध पुण्यात लावण्यात आलेले आहेत. या बॅनरमुळे पुण्यात चांगली चर्चा रंगली आहे. दरम्यान मित्रपक्षांसह शिवसेनेतून देखील त्यांच्या नावाला विरोध होत असताना त्यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे. 

काही नावांना विरोध 

शिवसेनेकडून 11 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांना डच्चू दिला आहे. तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांच्यासह संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देऊ नये, अशी भाजप पक्षाची देखील आग्रही मागणी होती. वादग्रस्त, आरोप असलेले चेहरे मंत्रिमंडळात नको, अशी चर्चा होती. पण तरीही संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे.  

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय राठोड महाविकास आघाडी सरकारमध्येही मंत्री होते. एका मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. हे गंभीर आरोप भाजपकडून करण्यात आले होते. त्यावेळी भाजपनं राठोड यांचा राजीनामा घेतला होता. यावेळी त्यांना मंत्रीपद देऊ नये अशी मागणी होत असताना देखील त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. 

संजय राठोड हे पाचव्यांदा निवडून आले

संजय दुलीचंद राठोड हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यांनी यावेळी पाचव्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत माणिकराव ठाकरे यांचा 28,775 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत त्यांना 143,115 मतं मिळाली. संजय राठोड हे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ही 2024 विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर ही त्यांची पाचवी टर्म असणार आहे. यापूर्वी त्यांनी 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये निवडून आले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Budget 2025 :  रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Budget 2025 :  रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द
Maharashtra Breaking News Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द
Embed widget