एक्स्प्लोर
खासदार संजय काकडेंचं संघाच्या गणवेशात पथसंचलन
गेल्या काही महिन्यांपासून संजय काकडेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक वाढवली होती.
पुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित पथसंचलनात सहभाग घेतला. पुण्यातील भोसलेनगर भागात आयोजित संचलनात खासदार काकडे संघाच्या गणवेशात सहभागी झाले आणि त्यांनी कवायतींमधेही भागही घेतला.
भाजपशी जोडले गेल्यानंतर खासदार काकडेंनी पुणे महापालिका निवडणुकीमधे निर्णायक भूमिका निभावली आणि पुण्यात भाजपची सत्ता आली. मात्र त्यानंतर खासदार संजय काकडे आणि भाजपचे पुण्यातील भाजपचे नेते यांच्यामधे खटके उडू लागले.
खासदार संजय काकडेंना भाजपची संस्कृती कळलेली नाही, अशी टीका त्यांचे पक्षांतर्गत विरोधक करत होते. या टीकेला उत्तर देण्याचा निश्चय केलेल्या काकडेंनी गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक वाढवली आणि दसऱ्याच्या दिवशी तर ते थेट संचलनातच सहभागी झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement