(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cricket Scores On Bixby : WorldCup च्या फायनल मॅचपूर्वी Samsungचा सिक्सर; आता Bixby वर दिसणार क्रिकेट स्कोअर
Cricket Scores On Bixby: सॅमसंगने आपल्या व्हॉईस असिस्टंट Bixby मध्ये अनेक फीचर्स जोडले आहेत, त्यानंतर क्रिकेटप्रेमींना सॅमसंगच्या मोबाइलवर क्रिकेटचा लाइव्ह स्कोअर जाणून घेता येणार आहे.
Cricket Scores On Bixby : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी (samsung) सॅमसंगने मोठा षटकार ठोकला आहे. खरं तर सॅमसंगने आपल्या व्हॉईस असिस्टंट Bixby मध्ये अनेक फीचर्स जोडले आहेत, त्यानंतर क्रिकेटप्रेमींना सॅमसंगच्या मोबाइलवर क्रिकेटचा लाइव्ह स्कोअर जाणून घेता येणार आहे. सॅमसंगने भारतीय क्रिकेटप्रेमींना ध्यानात घेऊन Bixbyमध्ये हे फीचर जोडले आहे, कारण क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना येत्या रविवारी म्हणजेच 19 नोव्हेंबरला होणार आहे. Bixby चे आयफोनमधील SIRI सारखं काम करते. आपण दिलेल्या कमांडनुसार काम करतं.
Bixby चे नवे फिचर
सॅमसंग बिक्सबी हा कंपनीचा व्हॉईस असिस्टंट आहे जो सॅमसंग डिव्हाइस आणि डिजिटल अप्लायन्सेसवर कुठेही आणि केव्हाही काम करू शकतो. नव्या फीचर्समुळे बिक्सबी युजर्स टेलिव्हिजन किंवा स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक क्रिकेट मॅचची माहिती तुम्हाला बिक्सबीला फक्त एवढंच विचारायचं आहे की स्कोअर काय आहे?, वर्ल्ड कप स्कोअर टेबल दाखवा किंवा मला मॅच दाखवा, मगच तुम्हाला तुम्ही मागितलेले डिटेल्स मिळतील. नुकतेच सादर करण्यात आलेले सर्व फीचर्स सर्व बिक्सबी युजर्ससाठी उपलब्ध आहेत. या युजर्सना नवीन फिचर्ससाठी काहीही इन्स्टॉल किंवा डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही.
Bixby म्हणजे काय?
सॅमसंग डिव्हाइसेसमध्ये येणारा AI असिस्टंट Bixby युजर्ससाठी अनेक उपयोगात येतो. हे केवळ आपल्या प्रश्नाचे उत्तर देत नाही तर आपल्या सर्व आज्ञांचे पालन देखील करते. हे कॅमेरा वापरून वस्तू शोधण्याचे काम करते.सध्या, Bixbyचे मुख्य काम आपल्याला आपल्या डिव्हाइसवर नेव्हिगेट करण्यात मदत करणे आहे. त्याचबरोबर आपल्या सवयीही शिकतो आणि आपल्या गरजेनुसार स्वत:ला तयार करतो. फोनमधील सर्व काम तुम्ही बिक्सबीच्या मदतीने करू शकता. बिक्सबी व्हॉईस उघडण्यासाठी एकतर फोनचे साइड बटण लाँग-प्रेस करावे लागेल किंवा तुम्हाला फक्त Bixby म्हणावे लागेल. याद्वारे तुम्ही टेक्स्ट मेसेज पाठवणे, रिमाइंडर सेट करणे, ईमेल वाचणे आणि फोन कॉल करणे इत्यादी गोष्टी करू शकता.
रविवारी फायनल मॅच आहे. ही मॅच पाहण्यासाठी प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी उत्सुक आहे. ही मॅच पाहण्यासाठी अनेकांनी ऑनलाईन तिकीटं खरेदी केले आहेत. मात्र ज्यांना तिकीटं मिळाले नाही किंवा जे हॉटस्टारवर पाहणार आहे. त्यांच्यासाठी आता नवा पर्यायदेखील आता उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी-