एक्स्प्लोर

मोठी बातमी : LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!

DME Gas: पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मधील शास्त्रज्ञांना एलपीजी (LPG) ला पर्याय ठरू शकेल अशा डायमिथाईल इथर अ डीएमई (DME) गॅसची निर्मिती करण्यात यश आलं आहे.

पुणे: अमेरिका-इस्रायल-इराण (Iran Israel War)  यांच्यात आज सलग 14 व्या दिवशी देखील युद्ध सुरु आहे. या युद्धाचा थेट फटका आता जागतिक अर्थव्यवस्थेला बसत असून युद्धामुळे जगभरात आणि विशेषतः भारतात एलपीजी (LPG) गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका आता हॉटेल्स आणि कारखान्यांसोबतच शाळांसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांनाही बसत आहे. एकीकडे एलपीजी (LPG) गॅसच्या तुटवड्यामुळे संपूर्ण जग हैराण झालेलं असताना पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मधील शास्त्रज्ञांना एलपीजी (LPG) ला पर्याय ठरू शकेल अशा डायमिथाईल इथर अ डीएमई (DME) गॅसची निर्मिती करण्यात यश आलं आहे.

गॅस LPG मधे आठ टक्के इतक्या प्रमाणात मिसळता येणार

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) मधील शास्त्रज्ञ डॉक्टर तिरुमलाईवामी राजा आणि त्यांच्या टीमने वीस वर्ष संशोधन करून हा गॅस तयार करण्यासाठी लागणारे उत्प्रेरक प्रयोगशाळेत तयार करण्यात यश मिळवलं आहे. या उत्प्रेरकापासुन तयार झालेल्या DME गॅसचे व्यावसायिक वापरासाठी उत्पादन करण्यात देखील यश आलं असून सध्या पायलट प्रोजेक्टमधे दररोज अडीचशे किलोच्या प्रमाणात तो तयार होत आहे. औद्योगिक कंपन्यांसोबत करार करुन या गॅसच मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास हा गॅस LPG मधे आठ टक्के इतक्या प्रमाणात मिसळता येणार आहे. त्यामुळे इंधनासाठी इतर देशांवर असलेलं अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. 

मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास या गॅसची किंमत LPG पेक्षा कमी असेल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. NCL मधील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं आहे. डायमिथाईल इथर अर्थात DE गॅस भारतीय बनावटीच्या उत्प्रेरकापासुन तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. LPG पेक्षा हा गॅस शुद्ध असल्याने या गॅसची फ्लेम पारदर्शक असते ज्यामुळे हा गॅस पर्यावरणपूरक ठरतो. हा गॅस स्वतंत्र देखील वापरता येतो आणि LPG मधे आठ टक्के मिसळून देखील त्याचा वापर करता येतो. DME गॅस मुळे LPG वरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास या गॅसची किंमत LPG पेक्षा कमी असेल.

Gas Shortage India : भारतात दरवर्षी किती एलपीजी वापरला जातो?

अहवालांनुसार, भारत दरवर्षी अंदाजे 31.3  दशलक्ष टन द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (एलपीजी) वापरतो. या एकूण गरजांपैकी सुमारे 87  टक्के घरगुती स्वयंपाकात वापरला जातो. सर्वात मोठी चिंता अशी आहे की भारताच्या एकूण एलपीजी गरजांपैकी 62 टक्के आयात केली जाते आणि या आयातीपैकी 85-90 टक्के होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते. अमेरिका-इराण युद्धामुळे हा मार्ग सध्या बंद आहे. सौदी अरेबियासारख्या देशांमधून एलपीजी टँकर या मार्गाने भारतात पोहोचत असत.

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Embed widget