Sachin Tendulkar Pune: पुण्यातील केवायसी जिमखान्याची आठवण सांगताना सचिन तेंडुलकर भावूक, म्हणाला...
मला अजूनही आठवतं की धावबाद झाल्यावर पॅव्हेलियनमध्ये परतताना मी रडत होतो. माझा पहिलाच सामना असल्याने मी अक्षरशः निराश झालो होतो.
Sachin Tendulkar Pune: सचिन तेंडुलकरने पुण्यातील पीवायसी जीमखान्यातील त्यांच्या पदापर्णाची आठवण सांगितली. ती आठवण सांगताना सचिन भावूक झाला होता. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याने सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अंडर-15 खेळताना काय काय घडलं होतं. याचं कथन त्याने या व्हिडीओत केलं आहे. सामन्यात त्याने चार धावा केल्या पण या सामन्यातील घटना आजही त्याच्या स्मरणात ताज्या आहेत. पुण्यातील पीवायसी जिमखान्यातील नॉस्टॅल्जिक क्षण असं त्याने व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे.
“मी नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी होतो, माझा शाळेतील सहकारी राहुल गणपुले फलंदाजी करत होता. त्याने ऑफ-ड्राइव्ह खेळला आणि मला तिसरी धाव घेण्यासाठी ढकलले. पण त्यावेळेस मी फार वेगवान नव्हतो. आणि शेवटी, मी धावबाद झालो. मी फक्त चार धावा करू शकलो,” सचिन म्हणाला. मला अजूनही आठवतं की धावबाद झाल्यावर पॅव्हेलियनमध्ये परतताना मी रडत होतो. माझा पहिलाच सामना असल्याने मी अक्षरशः निराश झालो होतो. मुंबई अंडर-15 संघाचे व्यवस्थापक अब्दुल इस्माईल आणि ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असलेले मिलिंद रेगे आणि वासू परांजपे यांसारख्या अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी त्याचे सांत्वन केले आणि आगामी सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. मी जवळपास 35 वर्षांनी पुन्हा मैदानावर येत आहे. त्यामुळे आता मी जरा भावूक झालो आहे.असं तो सांगतो.
काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. सचिनच्या असंख्य चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी कमेंट्समध्ये आयकॉनबद्दल त्यांचे प्रेम व्यक्त केले. व्हिडिओ अनेकांची शेअर देखील केला आहे. सचिन अनेकदा अनेक किस्से त्याच्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. त्याचे चाहते हे व्हिडीओ पाहून प्रभावित होतात. अनेक जण कमेंट्समध्ये त्यांच्या भावना व्यक्त करतात. मागच्या वेळी सचिन पुण्यातील ट्राफिकमध्ये अडकलेला असताना गाडीत कशी मजा करु शकतो याचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात तो आणि त्याचे काही सहकारी मोठ्याने मराठी गाणे गात होते. हा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता.
">