एक्स्प्लोर

Pimpri Chinchwad Accident: काळाचा घाला! लेह-लडाखवरून परतताना पिंपरीतील 3 मित्रांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; 30 फूट खोल दरीत कार कोसळून मृत्यू

Pimpri Chinchwad Accident: संपूर्ण पर्यटन आटोपून ते घरी परतत असताना, कोटा जिल्ह्यातील केथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत कराडिया ते बालापुरा इंटरचेंज दरम्यान त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

पिंपरी-चिंचवड: पर्यटनाचा आनंद घेऊन घराकडे परतणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील तीन तरुण मित्रांवर (Pimpri Chinchwad Accident) काळाने झडप घातली आहे. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात दिल्ली-मुंबई महामार्गावर बुधवारी (१८ मार्च) झालेल्या एका भीषण अपघातात (Pimpri Chinchwad Accident) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची कार पुलावरून सुमारे ३० फूट खाली कोसळल्याने हा थरार घडला.(Pimpri Chinchwad Accident)

Pimpri Chinchwad Accident: मृतांची नावे समोर

१. कुणाल किरण चोरडिया (वय २१, रा. चिंचवडगाव)
२. मयुरेश पांडुरंग पाडाळे (वय २१, रा. म्हाळुंगे पाडाळे, ता. मुळशी)
३. सिद्धांत रमेश आल्हाट (वय २१, रा. आल्हाट वस्ती, वाकड)

हे तरुण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तीन कारमधून लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या सहलीला गेले होते. संपूर्ण पर्यटन आटोपून ते घरी परतत असताना, कोटा जिल्ह्यातील केथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत कराडिया ते बालापुरा इंटरचेंज दरम्यान त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

Pimpri Chinchwad Accident: कारचा चक्काचूर; ३० फूट खोल कोसळली गाडी

केथून पोलीस ठाण्याचे अधिकारी मनोज सिंह सिकरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की नियंत्रण सुटलेली कार थेट पुलावरून ३० फूट खाली कोसळली. यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

Pimpri Chinchwad Accident: तो मित्र वाचला, पण बसला मोठा धक्का

या प्रवासात त्यांच्यासोबत असलेल्या एका मित्राला १७ मार्च रोजी अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे तो तातडीने विमानाने घरी परतला होता. तो ज्या कारमधून प्रवास करत होता, त्याच कारचा दुसऱ्या दिवशी अपघात झाल्याची बातमी समजताच त्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

Pimpri Chinchwad Accident: प्रशासकीय मदतीने मृतदेह शहरात आणणार

खासदार श्रीरंग बारणे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत सांगितले की, "हे तरुण काही दिवसांपूर्वी कारगिलमध्ये बर्फवृष्टीमुळे अडकले होते, तेव्हाही त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली होती. आता या अपघाताची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आहे. गुरुवारी सकाळी विमानाने या तिघांचे पार्थिव पिंपरी-चिंचवडमध्ये आणले जातील."

आमदार शंकर जगताप यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधून स्थानिक प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे चिंचवड, वाकड आणि म्हाळुंगे परिसरात शोककळा पसरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: आधी वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, आता अभिजीत दिपकेंविरोधात पोलिसांत तक्रार, नेमकं काय घडलं?
आधी वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, आता अभिजीत दिपकेंविरोधात पोलिसांत तक्रार, नेमकं काय घडलं?
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Embed widget