एक्स्प्लोर
पिंपरीत सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला!
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडकरांना घरफोडी आणि दरोडे तसे काही नवीन नाही. मात्र आज थेट सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या घरावरच चोरटयांनी डल्ला मारल्यानं सर्वानाच धक्का बसला.
विलास पुजारी असं सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे नाव असून, ते सध्या नवी मुंबईत कार्यरत आहेत. पिपंरी चिंचवडमध्ये ते पिंपळे सौदागरच्या यशदा नक्षत्र सोसायटीत राहतात.
पुजारी काल कुटुंबासोबत बाहेर गावी होते, तर त्यांचा मामे भाऊ हा रात्रपाळीला बाहेर गेला होता. घरात कुणीच नसल्याचा फायदा घेत, चोरटयांनी खिडकीची काच फोडून घरात प्रवेश केला आणि दीड लाख रोकडेसह तीन तोळे दागिने ही लंपास केले.
या चोरीनंतर सोसायटीचा सुरक्षारक्षक गायब झाल्यानं, त्यानेच चोरी केल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement