एक्स्प्लोर
ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्लेंची एक लाखांना फसवणूक
बंद पडलेल्या पॉलिसीचं नूतनीकरण करुन अधिक मोबदला देण्याचं आमिष आरोपींनी नागनाथ कोत्तापल्ले यांना दाखवलं होतं.
पिंपरी चिंचवड : मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांची एक लाख रुपयांना फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या नावाखाली दोघांनी कोतापल्लेंना लुटल्याची माहिती आहे.
बंद पडलेल्या पॉलिसीचं नूतनीकरण करुन अधिक मोबदला देण्याचं आमिष आरोपींनी नागनाथ कोत्तापल्ले यांना दाखवलं होतं. रेणुका आचार्य आणि प्रशांत दीक्षित अशी दोघा आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी सांगवी पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी दोन महिन्यांपूर्वी कोतापल्ले यांच्याशी संपर्क साधला आणि एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सच्या बंद पडलेल्या पॉलिसीचं नूतनीकरण केल्यास अधिकचा मोबदला मिळेल, असं आमिष दाखवलं. कोतापल्ले या आमिषाला बळी पडले आणि त्यांनी खात्यावर एक लाख रुपये जमा केले. यासाठी रेणुका आणि प्रशांत मोबाईल आणि ईमेलवरुन संपर्क साधायचे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
विश्व
बीड
Advertisement