Pune Rain Update : धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पुण्यातील चार धरणात 'इतका' पाणीसाठा, पाहा आकडेवारी
Pune Rain Update : जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात कोसळणारा पाऊस आता ओसरला आहे.
![Pune Rain Update : धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पुण्यातील चार धरणात 'इतका' पाणीसाठा, पाहा आकडेवारी rain subsided in the pune dam area water storage 93 percent in four dams in Pune see statistics Pune Rain Update : धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पुण्यातील चार धरणात 'इतका' पाणीसाठा, पाहा आकडेवारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/08/8dcf4c2dd5fcbf800d52c476e9072a2e1723096564368442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Rain Update : पुणे शहर परिसरातील धरणक्षेत्रात दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा (Pune Rain Update) ओसरल्याचं दिसून येत आहे. सध्या मुळशी, टेमघर, वडिवळे या धरणक्षेत्रांत आणि घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. पुणे शहर (Pune City) तसेच जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात कोसळणारा पाऊस आता ओसरला आहे. मात्र, चारही धरणांमधील पाणीसाठा 93.11 टक्क्यांवर पोहोचला आहे.
दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात 9 मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात 7 मिलिमीटर, पानशेत धरणक्षेत्रात 6 मिलिमीटर, तर खडकवासला धरण परिसरात अवघ्या 1 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सध्या टेमघर धरणातून 275 वीजनिर्मिती, 1087 क्युसेकने खडकवासला धरणात पाणी सोडण्यात येत आहे. वरसगाव आणि पानशेत धरणांतून वीजनिर्मितीसाठी प्रत्येकी 600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून शेतीसाठी नवीन मुठा उजवा कालव्यातून 1005 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहर (Pimpri-chinchwad City) आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 7.97 टीएमसी (93.64 टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune Rain) इतर धरणांपैकी कळमोडी, आंद्रा, भाटघर आणि उजनी ही धरणे 100 टक्के भरली असून या धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच पेडगाव, डिंभे, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, कासारसाई, गुंजवणी, नीरा देवघर आणि वीर ही धरणे काठोकाठ भरली आहेत, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
पुण्यातील चार ही धरणे मिळून 93.11 टक्के इतका पाणीसाठा
पुणे जिल्ह्यातील टेमघर धरण 100 टक्के भरलं आहे. तर इतर चारही धरणात सद्य स्थितीत 27.14 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
खडकवासला: 82.13 टक्के
पानशेत: 93.37 टक्के
वरसगाव: 92.59 टक्के
टेमघर: 100 टक्के
पुणे जिल्ह्यात पाऊस ओसरला
पुणे शहर (Pune Rain Update) परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचं दिसून येत आहे. पुणे आणि सातारा (Pune, Satara) या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट परिसरात मुसळधार पावसाची (Pune Havy Rain) शक्यता आहे. पुण्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याचा (Water) प्रश्न आती मिटला आहे. पुणेकरांसाठी हा मोठा दिलासा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)