एक्स्प्लोर

Pimpri Chinchwad : एक पाय निकामी, तरी रायगड किल्ला सर; अकरा वर्षीय ओमकारची प्रेरणादायी चढाई

Pimpri Chinchwad News : हौसला बुलंद हो, तो हर मंजिल आसान लगती है. ही शायरी पिंपरी चिंचवडमधील अकरा वर्षीय विद्यार्थ्याने सत्यात उतरवली आहे. अपघातात पाय गमावून बसलेल्या ओमकार लकडे या विद्यार्थ्याने चक्क रायगड किल्ला सर केला आहे.

Pimpri Chinchwad News : हौसला बुलंद हो, तो हर मंजिल आसान लगती है. ही शायरी पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) अकरा वर्षीय विद्यार्थ्याने सत्यात उतरवली आहे. अपघातात पाय गमावून बसलेल्या ओमकार लकडे या विद्यार्थ्याने चक्क रायगड किल्ला (Raigad Fort) सर केला आहे. महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेतील सहावीची सहल 20 जानेवारीला रायगडावर जाणार होती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा इतिहास वाचून प्रेरित झालेल्या ओमकारने गडावर येण्याची प्रखर इच्छा व्यक्त केली. त्याचा हा हट्ट पाहून शिक्षक ही अवाक् झाले. पालकही ओमकारच्या पाठिशी उभे राहिले. हे पाहून शाळेने त्याला रायगडावर घेऊन जाण्याचं निश्चित केलं. 

अन् कुबड्यांच्या मदतीने जोमाने रायगड किल्ला सर करु लागला...

ठरल्याप्रमाणे 20 जानेवारीच्या सकाळी रायगड सर करायला सुरुवात झाली. पण आता ओमकारला हे शक्य होईल का? आधीच एक पाय गमावलेल्या ओमकारला आणखी काही दुखापत तर होणार नाही ना? अशा प्रश्नांचा काहूर शिक्षक अन् इतर विद्यार्थ्यांच्या मनात करु लागले. ओमकार लकडेने मात्र जे ध्येय बाळगलं होतं, तो त्या दिशेने आगेकूच करु लागला. कोणाचीही मदत न घेता केवळ त्याच्या साथीला असणाऱ्या कुबड्यांच्या मदतीने तो जोमाने अन् सर्वांसोबत गड सर करु लागला. 

ओमकारला प्रोत्साहन देण्यासाठी 'जय भवानी जय शिवाजी' नाऱ्याचा जयघोष

शिवकाळात घोड्यांच्या टापांचा जसा आवाज रायगडावर घुमायचा अगदी तशीच अनुभती ओमकारचा कृत्रिम पाय अर्थात कुबड्यांमुळे येत होती. बघता बघता निम्मा टप्पा सर झाला होता, पण तरीही सोबतीला असणारे संजय येणारे, मदन साळवे, अनिता विधाटे हे शिक्षक आणि विद्यार्थी ओमकारसाठी चिंतेत होते. तो थकू नये म्हणून जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष वारंवार केला जात होता. आजूबाजूने निघालेले इतर शिवभक्त ही ओमकारला पाहून आश्चर्यचकित व्हायचे अन् त्याला प्रोत्साहन देत होते. 

सव्वा दोन तासात ओमकारने रायगड किल्ला सर केला

शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थित शिवभक्त यांच्या साथीने सव्वा दोन तासात ओमकार लकडेने रायगड किल्ला लीलया सर केला अन् त्याच जोमाने तो खालीही उतरला. ओमकारने केलेली ही किमया अनेकांना प्रेरणा देणारी ठरत आहे. म्हणूनच ओमकारच्या या जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्तीला एबीपी माझाचा सलाम....!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 24 डिसेंबर 2024 : 8 PM ABP MajhaAnjali Damania : Beed मध्ये 1,222 शस्त्र परवाने कसे वाटले? गोळीबाराचा व्हिडिओ पोस्ट ,दमानियांचा सवालMaharashtra Cabinet : मंत्रिपदी बढती, सुरु झाडाझडती; बावनुकळे, शिरसाट, कदमांकडून अधिकाऱ्यांना तंबीMaharashtra Superfast : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 24 Dec 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
Embed widget