![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने नेपाळहून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, रिक्षा चालकासह तिघांना अटक, हडपसर परिसरातील धक्कादायक घटना
हडपसर तेथील रेसकोर्स परिसरात एका रिक्षाचालकाने तिघांसोबत मिळून नेपाळहून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटकही केली आहे.
![रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने नेपाळहून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, रिक्षा चालकासह तिघांना अटक, हडपसर परिसरातील धक्कादायक घटना Punes Hadapsar rickshaw driver and three others arrested for Rape of a minor girl from Nepal because she dont have money to pay rickshaw fare रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने नेपाळहून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, रिक्षा चालकासह तिघांना अटक, हडपसर परिसरातील धक्कादायक घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/04/ed17c5a7b07b3647d9fa51bf4d84feaa_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Crime News : पुण्याच्या हडपसर तेथील रेसकोर्स परिसरात एका रिक्षाचालकाने नेपाळहून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबधित मुलीजवळ रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते, त्याचाच फायदा घेऊन संबंधित रिक्षाचालकाने या मुलीला रेसकोर्स जवळील एका सुनसान जागी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षाचालकासह तिघांना अटक केली आहे. सबंधित घटना 5 जानेवारी रोजी घडल्याचं समोर येत आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावं सागर बिभीषण बचुटे (वय 24), विकी कुमार पासवान (वय 23) आणि अशोक विर बहादुर थापा (वय 23) अशी असून पीडित मुलीचं वय 16 वर्ष आहे. संबधित मुलगी ही नेपाळहून 20 दिवसांपूर्वी भारतात नोकरीच्या शोधात आली होती. दरम्यान 5 जानेवारीला रात्री ती रिक्षातून तिच्या मैत्रीणीसोबत सागर बचुटे याच्या रिक्षातून प्रवास करत असताना त्या दोघींकडे पैसे नसल्याचा फायदा घेत आरोपी सागरने त्याच्या मित्रांसोबत मिळून तिचा बलात्कार केला. तिची मैत्रीण यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाली. दरम्यान त्यानंतर पीडित मुलीबरोबर तिच्या मैत्रीणीने हडपसर पोलिसांत जाऊन तक्रार केली. या प्रकरणी बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा -
- Pune Crime : पाळत ठेवून तब्बल 30 घरफोड्या करणारा गुन्हेगार गजाआड, पुणे गुन्हे शाखेची कारवाई
- Pune : कुत्र्यावरुन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी, वाद पोलीस ठाण्यात अन् तरुणीचा पोलिसांसमोरच गोंधळ
- Pune MHADA Lottery : पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 सदनिकांची ऑनलाईन लॉटरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)