एक्स्प्लोर
पुण्यात पाईपलाईन फुटून फवारे, हजारो लीटर पाणी वाया
पुणे : पुण्यातल्या सिंहगड रोडवरील वडगावमध्ये जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हजारो लीटर पाण्याची नासाडी होताना दिसत आहे.
सिंहगडरोडवर वडगावमध्ये टेकडीखालून जाणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. पाईपलाईन फुटल्यावर सुमारे तासभर पाणी वाया जात होतं.
पाण्याला जोर एवढा होता की जवळपास 30 फूट उंच कारंजं पाहायला मिळत होतं. एक तासानंतर ही जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली. पुण्यात सध्या प्रचंड पाणीटंचाई असून लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यातच एवढं पाणी वाया गेल्यानं लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement