(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लंडनहून विमानात येणाऱ्या प्रवाशाचं 7.60 लाखांचं सोनं गायब, पुण्यात गुन्हा दाखल
theft in Landon Mumbai Flight : बसस्थानक, रेल्वे स्थानकातून चोरी झाल्याच्या घटना वारंवार ऐकल्या असतील. पण विमानात चोरी झाली? यावर तुमचा विश्वास बसेल का?
theft in Landon Mumbai Flight : बसस्थानक, रेल्वे स्थानकातून चोरी झाल्याच्या घटना वारंवार ऐकल्या असतील. पण विमानात चोरी झाली? यावर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरेय. विमानप्रवासात सोन्याची चोरी झाली आहे. लंनडहून मुंबईला आलेल्या एका पुण्यातील व्यक्तीचे साडेसात लाख रुपयांचे सोनं चोरीला गेलेय. याप्रकरणी वाकड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. सचिन हरी कामत यांनी वाकड पोलिसांत याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ही घटना 1 ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये लंडन ते मुंबई या विमानप्रवासात घडलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कामत हे संगणक अभियंता आहेत. ते लंडन येथे एका कंपनीत काम करतात. ते पिंपरी चिंचवडमधील एका नातेवाइकाच्या लग्नासाठी येत होते. लंडन ते मुंबई ते जेट्टी या विमान प्रवासाने आले. लंडन येथून निघताना त्यांनी त्यांच्या सामानाच्या चार पिशव्या सीलबंद न करता सौदी एअरलाईन्सकडे दिल्या होत्या. त्या चार पिशव्यांमध्ये त्यांनी कपडे, अत्तर, चॉकलेट, इलेक्ट्रिक उपकरणे आणि 152 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ठेवले होते. कामत मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांना त्यांच्या पिशव्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी पिशव्यांचे ओळखपत्र मुंबई विमानतळ येथे जमा केले. त्यानंतर एका कुरिअर कंपनीद्वारे त्यांना त्यांच्या पिशव्या वाकड येथे मिळाल्या. दरम्यान, त्यांनी त्यांच्या पिशव्या तपासून पाहिल्या असता, त्यात त्यांचे सात लाख 60 हजारांचे दागिने दिसले नाहीत. यामुळे त्यांनी थेट वाकड पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत काय म्हटले ?
दिनांक 09/12/2023 रोजी दुपारी दोन वाजता ते दिनांक 11/12/2023 रोजी रात्रौ 09/40 वा. चे दरम्यान लंडन यु.के.ते जेड्डा ते मुंबई चे दरम्यान मी व माझी पत्नी काजल तसेच दोन मुली विभा व गार्गी असे लंडन ते मुंबई वाया जेड्डा असे विमान नंबर SV114, SV770 यांनी आलो. आम्ही लंडन येथून येत असताना आम्ही आमचे सामानाच्या चार बॅगा पॅक करुन सिलबंद न करता सौदिया एअरलाईन्सकडे देण्यात आलेल्या होत्या. सदरच्या चार बॅगांमध्ये आम्ही आमची कपडे, अत्तर, चॉकलेट, इलेक्ट्रीक उपकरणे तसेच 152 ग्रॅम वजनाचे सोन्याचे वापरण्याचे दागिणे ठेवण्यात आलेले होते. आमच्या बॅगा आम्हाला मुंबई येथील विमानतळावर न मिळाल्याने आम्ही आमचेकडील बॅगांचे आयडी क्रमांक मुंबई विमातळ येथे जमा केलेनंतर यश कार्गो, संतोषी माता नगर, अंधेरी इस्ट मुंबई यांचे मार्फतीने मुंबई ते वाकड असे आमच्या चारही बॅगा पुणे येथे प्लॅस्टीक टेंगने सिलबंद मिळाल्या असता आम्ही बॅगचे सिल तोडून आम्ही उघडून पाहिल्या असता त्यातील वरील वर्णनाचे सोन्याचे दागिने लंडन ते जड्डा ते सहारा एअरपोर्ट मुंबई ते वाकड, पुणे दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने लबाडीचे इराद्याने स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता चोरुन नेलेचे खात्री झाली आहे. म्हणून माझी तक्रार आहे. आज रोजी पर्यंत मी माझ्या चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिन्यांबाबत छञपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, तसेच इतर ठिकाणी शोध घेतला परंतु त्या मला मिळून न आल्याने मी माझ्या घरच्यांशी विचारविनिमय करुन आज रोजी तक्रार देण्याकरीता पोलीस स्टेशन येथे आलो आहे. नमुद मजकुरचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आहे.