Pune Visarjan Miravnuk 2023 Live updates: लाखो पुणेकर, मुसळधार पाऊस पण मिरवणुकीचा जल्लोष कायम; मानाच्या पहिल्या गणपतीचं परंपरेनुसार विसर्जन
Pune Visarjan Miravnuk 2023: दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. पुण्यातील मिरवणुकीचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
LIVE
Background
पुण्यातील बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका ही एक पर्वणीच असते. मानाचे बाप्पा वाजत-गाजत पुढे पुढे सरकत असताना, असंख्य भाविकांची मांदियाळी निरोप देण्यासाठी उपस्थित असते... या काळात पोलीसही चोख बंदोबस्त ठेवतात... यंदा मात्र गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यावरून पुण्यातील महत्वाच्या गणेश मंडळांमध्ये मतभेद दिसून येतायत. त्यामुळं पुण्यातील विसर्जन मिरवणूक व्यवस्थित आणि वेळेत पार पाडण्याचं आवाहन पुणे पोलिसांसमोर असणार आहे.
पुण्यातील गणेशोत्सव जेवढा खास असतो तेवढीच विसर्जन मिरवणूक देखील विशेष असते . सकाळी दहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानांत पाच मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्यावर दाखल होतात . संध्याकाळपर्यंत मानाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर इतर गणपती मंडळं पोलिसांनी ठरवून दिलेल्या क्रमाने लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात . मात्र दरवर्षी विसर्जन मिरवणुक पार पडण्याचा वेळ वाढत चाललाय . मागील वर्षी काही गणेश मंडळांनी अलका चौकातून विसर्जन मिरवणूक पुढे नेण्यास कित्येक तास लावल्यानं दगडूशेट हलवाई गणपतीला विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास दुसरा दिवस उजाडला होता . त्यामुळं यावर्षी दुपारीच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ असं जाहीर केलंय .
मात्र पुण्यातील भाऊ रंगारी , बाबू गेनू , मंडई आणि राजाराम गणेश मंडळाने मात्र आपण ठरलेल्या क्रमानुसार संध्यकाळीच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ अशी भूमिका घेतलीय . विसर्जन मिरवणुकीसाठी या गणेश मंडळांकडून सुंदर रथ तयार केले जातात आणि त्या रथांना आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते . मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास मध्यरात्र उलटून जाते . काही मंडळांना तर दुसरा दिवस उजाडतो . त्यामुळं अनेकदा मंडळा - मंडळांमध्ये तणावाची परिस्थिती देखील निर्माण होतेय . मात्र ठरलेला क्रम मोडल्यास आणखी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्यानं आपण नेहमीप्रमाणेच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ असं पुण्यातील प्रमुख मंडळांनी म्हटलंय . मात्र कुठल्या गणेश मंडळाने विसर्जन मिरवणुकीत कधी सहभागी व्हायचं हे ठरवण्याची जबादारी पोलिसांची असते . त्यामुळं पोलिसांच्या भूमीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. विसर्जन मिरवणुकीचे सगळे नियोजन पूर्ण झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय .
मागीलवर्षी काही गणेश मंडळांनी अलका चौकात ठाण मांडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती . तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांना स्वतः रस्त्यावर उतरून विसर्जन मिरवणूक मार्गस्थ करावी लागली होती . या विलंबामुळं इतर मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती . त्यामुळं यावेळी विसर्जन मिरवणुक वेळेत पार पाडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे .
हिंदू धर्मशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या आधी गणेशाचं विसर्जन होणं अपेक्षित असतं . मात्र गणेशोत्सवाच्या नऊ दिवसांत सगळे विधी आणि सोहळे यथासांग पार पडणारी अनेक मंडळ दहाव्या विसर्जनाच्या दिवशी मात्र उन्मादी अवस्थेला पोहचतात . पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत गेली काही वर्ष त्यामुळेच अनेकदा तणावाचं वातावरण निर्माण होत . ती टाळण्याची जबाबदारी या गणेश मंडळांची तर आहेच पण सर्वात मोठं कर्तव्य आहे ते पोलिसांचं . पुणे पोलीस बोटचेपी भूमिका घेतात की नियमांवर बोट ठेवतात यावर पुण्यातील विसर्जन मिरवणूक कशी पार पडणार हे ठरणार आहे
Pune Ganesh Visarjan 2023 : दगडूशेठचं यंदा अनंत चतुदर्शीलाच विसर्जन
Pune Ganesh Visarjan 2023 : दगडूशेठ गणपतीचं यंदा अनंत चतुर्दशीलाच विसर्जन झालं. आता हीच परंपरा यापुढं कायम ठेवू, असा संकल्प ही आज करण्यात आलाय.
Pune Ganesh Visarjan 2023 : मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचं 6 वाजून 32 मिनिटांनी विसर्जन
Pune Ganesh Visarjan 2023 : मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे 6 वाजून 32 मिनिटांनी विसर्जन झाले. डेक्कन परिसरातील महापालिकेच्या हौदात विसर्जन करण्यात आलं.
Pune Ganesh Visarjan 2023 : पुण्याचा मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं 5 वाजून 55 मिनिटांनी विसर्जन
Pune Ganesh Visarjan 2023 : पुण्याचा मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन 5 वाजून 55 मिनिटांनी करण्यात आलं. पाचांळेश्वर घाटावर या गणपतीला निरोप देण्यात आला.
Pune Ganesh Visarjan 2023 : मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं 5 वाजून 11 मिनिटांनी विसर्जन
Pune Ganesh Visarjan 2023 : मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं 5 वाजून 11 मिनिटांनी विसर्जन झालं. पालखीत दाखल होत मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली होती. अखेर अनेकांनी तांबडी जोगेश्वरी बाप्पाला साश्रु नयनांनी निरोप दिला.
Pune Ganesh Visarjan 2023 : पुण्याचा मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती पाच वाजता अल्का टॉकीज चौकात दाखल
Pune Ganesh Visarjan 2023 : पुण्याचा मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती पाच वाजता अल्का टॉकीज चौकात दाखल झाला आहे. काही वेळात या गणपतीचं विसर्जन होईल.