एक्स्प्लोर
पुण्यात ज्वेलर्सकडे दोघींचा मंगळसूत्रावर डल्ला, प्रकार सीसीटीव्हीत
अडीच ते तीन तोळे वजनाचं मंगळसूत्र पुण्यातील सोनाराच्या दुकानातून दोन महिलांनी लंपास केलं

पुणे : पुण्यात सोनाराच्या दुकानातून दोन महिलांनी हातचलाखीने मंगळसूत्र लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आरोपी महिलांचा शोध पोलिस घेत आहेत. पुण्यातील समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या 'परमार ज्वेलर्स' या सराफाच्या दुकानात चोरीची घटना घडली. शनिवारी दोन महिला दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आल्या. दुकानदाराला गुंगवून त्यांनी हातचलाखीने एक मंगळसूत्र लंपास केलं. हे मंगळसूत्र अडीच ते तीन तोळे वजनाचं असून त्याची किंमत तब्बल 70 हजार रुपयांच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी समर्थ पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























