एक्स्प्लोर

Pune Truck Accident : ब्रेकफेल झालेल्या ट्रकचा चालकाविना प्रवास, मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर ट्रकचा थरार

Pune Truck Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोठा अनर्थ टळला. विनाचालक एक ट्रक सुसाट वेगाने डिवायडरवर धडकत धावत होता. सुदैवानं ट्रकने कोणत्याही गाड्यांना धडक दिलेली नाही.

Pune Truck Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोठा अनर्थ टळला. विनाचालक एक ट्रक सुसाट वेगाने डिवायडरवर धडकत धावत होता. सुदैवानं ट्रकने कोणत्याही गाड्यांना धडक दिलेली नाही. मोठी दुर्घटना टळली. हा ट्रक पुण्याहून सिमेंटच्या गोणी घेऊन मुंबईकडे निघाला होता. अमृतांजण पुलाआधी ट्रकचा ब्रेकफेल झाला होता. घाबरून ट्रक चालकाने उडी मारली, पण ट्रक मात्र सुसाट वेगाने धावतच होता. ट्रक डिवायडरला धडक देत पुढे जात होता. अमृतांजण पुलापुढे गेल्यावर हा ट्रक थांबला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर विनाचालक ट्रकचा थरारक प्रवासाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

ब्रेकफेल झालेल्या ट्रकचा चालकाविना प्रवास

एक ट्रक पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. हा ट्रक सिमेंटच्या गोळ्या मुंबईकडे घेऊन जात होता. यावेळी अचानक ट्रकचा ब्रेक फेल झाला. ही बाब ट्रकचालकाच्या लक्षात आली. यावेळी ट्रकचालकाने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी घाबरून ट्रकमधून खाली उडी मारली. यावेळी ट्रकचा ब्रेकफेल झालेला असल्यामुळे ट्रक तसाच विनाचालक रस्त्यावरून धावत होता. ट्रक अमृतांजण पुलाजवळ असताना ट्रकचा ब्रेकफेल झाला. ड्रायव्हरने ट्रकमधून उडी मारल्यानंतर ट्रक विनाचालक पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सुसाट धावत होता. ट्रक डिवायडरवर धडक देत भरधाव वेगाने धावत होता. ट्रकचा हॅन्डब्रेक निकामी झाल्याने ट्रक बिना चालकाचा सुसाट पळाला. अमृतांजन पुलापासून सुमारे 500 मीटर अंतरावर ट्रकने खडकाला धडक दिल्याने ट्रक थांबला आणि मोठा अपघात टळला.

Pune Truck Accident : पाहा व्हिडिओ : विनाचालक ट्रकचा अपघात, ब्रेक फेल झाल्याने घडला अपघात

विनाचालक एक ट्रक सुसाट वेगाने डिव्हाईडर धडकत धावत होता. सुदैवाने त्याची ठोकर इतर वाहनांना लागली नाही. अन्यथा पुण्यातील नवले पुलावर जसं असंख्य वाहनांना एका अवजड वाहनाने धडक दिली. अगदी तसंच काहीसं इथंही घडलं असतं. पुण्याहून सिमेंटच्या गोणी घेऊन हा ट्रक मुंबईला निघाला होता. तेव्हाच अमृतांजण पुलाच्या आधी ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि या ट्रकची आधी बसला धडक बसली. त्यामुळे घाबरलेल्या चालकाने ट्रकखाली उडी घेतली. ट्रक मात्र तसाच सुसाट वेगाने पुढं गेला अन डिव्हाईडरला धडकत धावत राहिला. अमृतांजन पुलापुढे गेल्यावर ट्रक थांबला अन सर्वांचा जीव भांड्यात पडला. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nashik Accident: गाडीत क्षमता पाच जणांची, बसले आठजण! टायर फुटले अन् विशीतील पाच मित्रांनी गमावला जीव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget