एक्स्प्लोर
दौंडमध्ये माथेफिरुचा बेछूट गोळीबार, तिघांचा मृत्यू
गोळीबार करणारा माथेफिरु कोण आहे? कोणत्या कारणामुळे त्याने हे कृत्य केलं? याचा पोलिस शोध घेत आहेत.

पुणे : पुण्यातील दौंड तालुक्यात एकाच व्यक्तीने दोन ठिकाणी केलेल्या बेछूट गोळीबारात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. नगर मोरी चौक आणि बोरावके नगरमध्ये ही घटना घडली. हल्लेखोर राज्य राखीव पोलीस दलाचा कर्मचारी आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास त्याने सुरुवातीला नगर मोरी चौकात गोळीबार केला. यात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांच्या अंतराने त्यानेच बोरावके नगरमध्येही अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. महत्वाची बाब म्हणजे गोळीबार करणारा संजय शिंदे नावाचा राज्य राखीव पोलीस दलाचा कर्मचारी आहे. या माथेफिरुने केलेल्या गोळीबारात अमोल जाधव, गोपाळ शिंदे आणि प्रशांत पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा माथेफिरु त्याच्या घरी जाऊन बसला असून, पोलिसांनी त्याच्या घराला वेढा दिला आहे. मात्र, शिंदे यांने गोळीबार का केला? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
आणखी वाचा























