एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात भररस्त्यात स्विफ्ट पेटली, तीन प्रवासी जळून खाक
स्विफ्ट गाडीने पेट घेतल्यानंतर बाहेर पडायला वेळ न मिळाल्यामुळे तिघंही जळून खाक झाले.
पिंपरी : पुणे जिल्ह्यातील वडगाव आनंदमध्ये स्विफ्ट डिझायर कारने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच जळून मृत्यू झाला.
मंगळवारच्या मध्यरात्री दीड वाजता पुण्यातील वडगाव आनंद भागात ही घटना घडली. गाडीतील तिघं जण पुण्यावरुन घरी परतत होते. त्यावेळी प्रशांत चासकर यांच्या घरापासून 100 मीटर अंतरावर गाडीने पेट घेतला.
गाडीतून बाहेर पडायला वेळ न मिळाल्यामुळे तिघंही जळून खाक झाले. तिघे ही मेडिकल व्यावसायिक असल्याची माहिती आहे. गाडीला आग लागण्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे गाडीने पेट घेतल्यानंतर शेजारुन जाणारी एकही गाडी आग विझवण्यासाठी किंवा मदतीसाठी थांबली नाही. कोणी प्रयत्न केला असता, तर कदाचित तिघांचा जीव वाचला असता, अशी खंत व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement