Pune Sinhagad Video: सिंहगडावर परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवल्या, आता हुल्लडबाज तरुणाला उपरती, व्हिडीओ बनवून माफी मागितली!
मित्रांच्या नादाने घाण शिव्या दिल्या. प्लीज मला माफ करा असा व्हिडिओ करत शिव्या शिकवणाऱ्या मुलाने कॅनडामधून आलेल्या पर्यटकाची माफी मागितली.

Pune: पुण्यातील सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या हुल्लडबाज दोडक्याची मोठी चर्चा होती. छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे प्रतीक असलेला तसेच तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाचे जिवंत स्मारक असलेल्या किल्ले सिंहगडावर आलेल्या पर्यटकाला शिव्या शिकवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यातील तरुणाला आता उपरती झाली आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला भानच राहिला नाही की मी गड किल्ल्यावर आहे आणि मित्रांच्या नादाने घाण शिव्या दिल्या. प्लीज मला माफ करा असा व्हिडिओ करत शिव्या शिकवणाऱ्या मुलाने कॅनडामधून आलेल्या पर्यटकाची माफी मागितली.(Sinhgad Tourist Video Viral)
छत्रपती संभाजीनगर मधील काही तरुणांनी पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर कॅनडामधून आलेल्या पर्यटकाला शिव्या शिकवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. परदेशी पर्यटक सिंहगड किल्ला फिरत असताना या टवळखोर तरुणांनी अश्लील शिव्या शिकवल्या. या व्हिडिओवर प्रचंड संताप व्यक्त केल्यानंतर तरुणांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. यावरून तीन ते चार तरुणांविरुद्ध पुणे ग्रामीण मधील हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हुल्लडबाज तरुणाला उपरती
परदेशी पर्यटकाला सिंहगडावर शिवेगाळ करायला लावणाऱ्या हुलडबाज तरुणाला आता त्याचे टवाळखोरीची उपरती झाली आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला भानच राहिला नाही मी गड किल्ल्यावर आहे. मित्रा मित्रांमध्ये नादाने घाण शिव्या दिल्या. त्यामुळे खूप मोठी चूक झाली. प्लीज मला माफ करा अशा आशयाचा व्हिडिओ करत तरुणाने माफी मागितली आहे.
शिवरायांच्या पवित्र गडावर परदेशातून आलेल्या तरुणाला लाज आणणारं कृत्य करायला लावण्यात आलं. यात पुण्यातील (Pune) टवाळखोरांनी कॅनडामधून आलेल्या काही पर्यटकाला सिंहगड किल्ल्यावर शिव्या द्यायला शिकवले होतं. भाषेच्या अज्ञानामुळे आपण शिव्या देतोय याची पुसटशी शंका ही या विदेशी पर्यटकाला आली नाही. मात्र हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उजेडात आला आणि सर्वत्र संतापाची एकच लाट पसरली. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी या टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुणे ग्रामीण पोलिसांकडून या टवाळखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. कॅनडामधून आलेल्या पर्यटकाला सिंहगड किल्ल्यावर या टवाळक्यांनी शिव्या द्यायला शिकवल्या होत्या. याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकारणी गुन्हा नोंदवून पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.
हेही वाचा:























