(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Sextortion Crime : सेक्सटॉर्शनचा पहिला बळी! न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने 22 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं
Pune Sextortion Crime : पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हाॅट्सअपवरून एका अनोळखी महिलेसोबत झालेल्या ओळखीतून न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी येऊ लागल्याने एका 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे.
Pune Sextortion Crime : पुण्यात (Pune News) सेक्सटॉर्शनचा (Sextortion) धक्कादायक (Crime News) प्रकार समोर आला आहे. व्हाॅट्सअॅपवरुन एका अनोळखी महिलेसोबत झालेल्या ओळखीतून न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी येऊ लागल्याने एका 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या (Suicide) केली आहे. अमोल राजू गायकवाड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनकवडी परिसरात 30 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना असल्याचं सायबर (Cyber Crime) पोलिसांनी सांगितलं आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाच्या भावाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. मृत राजू गायकवाड याची व्हाॅट्सअॅपवरुन एका महिलेसोबत ओळख झाली होती. त्या अनोळखी क्रमांकावर राजू गायकवाड याचं आणि त्या महिलेचं व्हाॅट्सअॅपवरील संभाषण वाढत गेलं. समोरील अनोळखी व्यक्तीने राजू गायकवाड याचा न्यूड व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करण्याची भीती दाखवली. त्यानंतर वेळोवेळी त्याच्याकडून फोन पे वरुन साडेचार हजार रुपये उकळले. दरम्यान आणखी पैशाची मागणी सुरु होती. या सर्व त्रासाला कंटाळून राजू गायकवाड यांनी अखेर राहत्या घरात आत्महत्या केली. सहकारनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
सायबर सेक्सटॉर्शन (Sextortion) म्हणजे काय?
हा सोशल मीडियामार्फत होणारा लैंगिक शोषणाचा प्रकार आहे. हा गुन्हा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे घडतो. जिथे गुन्हेगार बनावट प्रोफाईल बनवतात त्यानंतर ते अनोळखी लोकांशी ऑनलाईन घट्ट मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. एकदा ओळख झाली की ते त्यांच्या पीडितांना नग्न फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी प्रोत्साहित करतात. व्हिडीओ कॉल करत नग्न व्हायला सांगतात आणि तो फोन रेकॉर्ड करतात. एकदा त्यांच्याकडे असे फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर त्यांना हे व्हिडीओ पाठवून छळ करतात. पैशांची मागणी करतात. पैसे दिले नाही तर सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देतात. सुरुवातीला तरुणांना या जाळ्यात कसं अडकवता येईल याचा विचार केला जातो. अनेक तरुण वाहवत जात अशा प्रकारच्या जाळ्यात अडकतात. या सगळ्यासाठी वयाची मर्यादा नाही. सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येकाला अशा प्रकारची वर्तवणूक करण्यास भाग पाडलं जाऊ शकतं. तरुण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, चॅटिंग अॅप्स आणि डेटिंग अॅप्समध्ये तरुण मोठ्या प्रमाणावर गुंतले असतात. त्यामुळे त्यांनाच या सगळ्यासाठी लक्ष केलं जातं.