एक्स्प्लोर
Advertisement
डीएसके आणि हेमंती कुलकर्णींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा जामीन अर्ज आज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.
पुणे : गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्यामुळे तुरुंगात गेलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा जामीन अर्ज आज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.
डीएसके आणि हेमंती यांना 17 फेब्रुवारीला अटक झाली होती. आधी दोघंही पोलिस कोठडीमधे होते, त्यानंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.
दोघांनीही वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी डीएसके तुरुंगाबाहेर येणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद डीएसकेंच्या वकिलांनी केला होता. त्याचबरोबर त्यांच्या तब्येतीचं कारणही देण्यात आलं होतं.
प्रतिवाद करताना सरकारी वकिलांनी डीएसकेंना या आधी गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला, परंतु त्या कालावधीत ते पैसे परत करु शकले नसल्याचं सांगितलं.
डीएसके आणि हेमंतींनी विविध मार्गांनी तीन हजार कोटी रुपये जमा केले असून त्यातील चोवीसशे कोटी रुपये इतरत्र वळवल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं होतं. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद काल ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने दोघा पती-पत्नीचा जामीन अर्ज फेटाळला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement