एक्स्प्लोर
Advertisement
पत्नीच्या अस्थी विसर्जित करुन परतताना पुण्यात रिक्षाचालकाचाही मृत्यू
पत्नीच्या अस्थी विसर्जन करुन परतताना रिक्षाचालक शिवाजी परदेशी यांचा मृत्यू झाला, तर जखमी झालेला मुलगा आणि मुलीवर उपचार सुरु आहेत.
पुणे : पुण्यात अनधिकृतपणे उभारलेलं होर्डिंग हटवताना ते अंगावर पडल्यामुळे रिक्षाचालकाला प्राण गमवावे लागले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आदल्याच दिवशी त्यांच्या पत्नीचंही निधन झालं होतं.
रिक्षाचालक शिवाजी परदेशी यांची पत्नी प्रीती यांचं कालच निधन झालं होतं. पत्नीच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी ते चार वर्षांचा मुलगा समर्थ, 17 वर्षांची मुलगी समृद्धी आणि आईला सोबत घेऊन आळंदीला गेले होते.
अस्थी विसर्जनानंतर परत येताना जुना बाजार चौकात त्यांच्या रिक्षावर होर्डिंग कोसळलं. त्यामध्ये शिवाजी परदेशी यांचा मृत्यू झाला, तर जखमी झालेला मुलगा आणि मुलीवर उपचार सुरु आहेत.
या घटनेमुळे परदेशी कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. लागोपाठ दोन दिवसात आई-वडिलांचं छत्र हरपल्यामुळे परदेशींचा मुलगा आणि मुलगी पोरके झाले.
पुण्यातील जुना बाजार चौकात अनधिकृतपणे उभारलेलं होर्डिंग अंगावर पडून तीन जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी आहेत. चौकात रेल्वेच्या जागेमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेली होर्डिंग्ज काढत असताना ही घटना घडली.
रेल्वे प्रशासनाकडून हे होर्डिंग्ज काढण्याचं काम सुरु होतं. मात्र ते करताना होर्डिंग्जचे अँगल्स वरुन कापत येण्याऐवजी खालून कापले जात असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
चौकातून निघालेल्या पाच रिक्षा आणि एका कारमधील प्रवासी होर्डिंग्जच्या अँगल्सखाली आले. या चौकात पाच रस्ते एकत्र येतात. शनिवार वाडा, पुणे स्टेशन, आरटीओ कार्यालय, जिल्हा न्यायालय आणि मंगळावर पेठेतून येणारे रस्ते या चौकात एकत्र येतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
पुणे
महाराष्ट्र
Advertisement