एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील रांका ज्वेलर्स चोरीचा उलगडा
परंतु पुणे स्टेशनच्या 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मशेजारील रिक्षा स्टँडवर आपल्यावर चाकूने वार करत चार चोरट्यांनी दीड कोटींचे हिरे आणि सोन्याचे दागिने लंपास केले, अशी तक्रार अजय होगाडेने केली होती.
![पुण्यातील रांका ज्वेलर्स चोरीचा उलगडा Pune : Ranka Jewellers theft revealed पुण्यातील रांका ज्वेलर्स चोरीचा उलगडा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/30155607/Pune-Jewellery.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यात रांका ज्वेलर्सच्या चोरीचा अखेर उलगडा झाला आहे. कर्मचाऱ्यानेच दागिन्यांच्या चोरीचा बनाव रचला होता. अजय होगाडे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. अजय होगाडे या दुकानात ऑफिसबॉय म्हणून काम करतो. पोलिसांनी चोरीला गेलेले दागिने जप्त केले आहेत.
मुंबईतील झवेरी बाजारातील रांका ज्वेलर्सचा कर्मचारी अजय होगाडे दीड कोटींचे दागिने घेऊन पुण्याला गेला होता. परंतु पुणे स्टेशनच्या 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मशेजारील रिक्षा स्टँडवर आपल्यावर चाकूने वार करत चार चोरट्यांनी दीड कोटींचे हिरे आणि सोन्याचे दागिने लंपास केले, अशी तक्रार अजय होगाडेने केली होती. बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये चार अज्ञांतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र पोलिसांना तक्रारदार अजय होगाडेविषयी संशय आल्याने त्याची चौकशी केली असताना त्यानेच हा बनाव रचल्याचं पोलिस तपासात समोर आलं. कर्जबाजारी झाल्याने वडील आणि भावाच्या मदतीने हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली. होगाडे कुटुंबावर 12 लाख रुपयांचं कर्ज होतं. ते फेडण्यासाठी शरद होगाडे, अन्नू कुमार आणि मारुती बाबू होगाडे यांच्या मदतीने चोरी केल्याचं अजयने सांगितलं.
घटनेच्या दिवशी आरोपीने स्वत:च्या अंगावर जखमा केल्या आणि भाऊ शरद होगाडे तसंच मित्र अन्नू कुमार यांच्याकडे दागिने मुंबईला पाठवले. तिथून हे दागिने रायगडला पाठवले. हे दागिने एका डब्ब्यात ठेवून रायगड इथल्या टकमक टोकाच्या खाली डोंगराच्या पायथ्याला असलेल्या जमिनीत पुरले होते. त्यानंतर पोलिसांनी सर्व दागिने जप्त केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)