Pune Rain Update: 4 तासाच्या पावसाने पुणे पाण्याखाली; 10 झाडपडीच्या घटना अन् गाड्या वाहून गेल्या... पुणेकरांचं मोठं नुकसान
पुण्यात 4 तास मुसळधार पाऊस झाला. अचानक मुसळधार आलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच फजिती झाली. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुण्यात पाऊस पडणार असा अंदाज दर्शवण्यात आला होता. मात्र त्या दिवशी पावसाने हजेरी लावली नाही.
Pune Rain Update: पुण्यात 4 तास मुसळधार पाऊस झाला. अचानक मुसळधार आलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच फजिती झाली. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुण्यात पाऊस पडणार असा अंदाज दर्शवण्यात आला होता. मात्र त्या दिवशी पावसाने हजेरी लावली नाही. विसर्जन मिरवणुक पार पडल्यानंतर मात्र 4 तासांच्या पावसाने पुणं धून काढलं. या पावसामुळे पुणेकरांचं मोठं नुकसान झालं आहे.
अनेकांच्या घरात पाणी शिरलं
पुण्यात अनेक सखोल भाग आहेत. दरवर्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरतं. काल झालेल्या पावसाने देखील अनेक परिसरातील घरात पाणी शिरलं त्यामुळे नागरीकांचं मोठं नुकसान झालं आहे. आंबील ओढा, वानवडी या परिसरतील काही घरांमध्ये अति प्रमाणात पाणी शिरल्याने नागरीकांना रात्री मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं. चंदननगर पोलिस स्टेशन, वेदभवन, कोथरुड, वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड, लमाण तांडा, पाषाण,सोमेश्वर वाडी, पाषाण,वानवडी, शितल पेट्रोल पंप, बी टी ईवडे रोड,काञज उद्यान या परिसरासह अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पाणी साचलं होतं. शहरात पाणी साचल्याच्या असंख्य घटना घडल्या असताना अग्निशमन दलाच्या जवानांनी हडपसर गाडीतळजवळील घटनेत 3 महिला आणि घोरपडी गाव येथील एक जेष्ठ महिलेला घरात आलेल्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढले.
दहाहून अधिक झाडपडीच्या घटना
मुसळधार पावसामुळे पुण्यातील धनकवडी भागातील चव्हाण सोसायटीमधील पन्नास वर्षे जुने वडाचे झाड कोसळले. यात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र सोसायटीत राहणारे अनिल पावसकर आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या दारातच हे भले मोठे झाड कोसळल्याने बाहेर येऊ शकत नव्हते. त्यांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. त्याचबरोबर एनसीएल जवळ पाषाण, साळुंखे विहार, कोंढवा, ज्योती हॉटेल जवळ कोंढवा, चव्हाणनगर, रुबी हॉल जवळ, पुणे स्टेशन या परिसरात झाड पडले आहेत मात्र यात कोणीतरी जीवितहानी झाली नाही आहे. पाषाण, पंचवटी, स्टेट बैंक नगर येथे पहाटे दोन चारचाकी वाहनांवर झाड कोसळले होते.
पोलिसच कामात आले
पावसामुळे विमाननगर चौकात प्रचंड प्रमाणात रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे परिसरात वाहतून कोंडीदेखील मोठ्या प्रमाणात झाली होती. त्याच वेळी वाहतूक पोलिसांनी चेंबरमध्ये पाणी जाण्यासाठी सोय नव्हती. त्यात कचरा अडकल्याचं पोलिसांच्या लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी स्वत: चेंबरमधील कचरा काढून नागरीकांना वाट करुन दिली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
Pune Rain: पुण्यात पावसाचं धुमशान; जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो, पाण्याची चिंता मिटली